Virender Sehwag On Kane Williamson : भारताने ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) विरुद्धची 4 टेस्ट मॅचची सीरिज 2-1 अशी जिंकली. त्याचबरोबर टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final 2023) प्रवेश केलाय. भारत सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकला. मात्र, टीम इंडियाबरोबरच भारताला फायनलमध्ये पोहोचवण्याचं श्रेय जातं न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन (Kane Williamson) याला. अखेरच्या चेंडूवर धाव घेत केनने करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड श्रीलंका सामन्यात विल्यमसन न्यूझीलंडच्या (NZ vs SL) विजयाचा हिरो ठरला. केनने नाबाद 121 धावांची धुंवाधार खेळी खेळली. सामना 2 गडी राखून जिंकल्यानंतर केन खूप भावूक झाल्याचं पहायला मिळालं. किवी संघाच्या या विजयासह टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरली आहे. केनच्या या झुंझार खेळीचं सेहवागने (Virender Sehwag On Kane Williamson) देखील ट्विट करत कौतूक केलंय.


सामन्यात नक्की काय झालं?


न्यूझीलंड आणि श्रीलंका (New Zealand VS Sri Lanka) यांच्यात सामन्यात खेळला जात असताना अखेरीस 2 बॉलवर 1 धावाची गरज होती. एक बॉल बाऊसर टाकण्यात आला. त्यामुळे तो केनला (Kane Williamson) खेळता आला नाही. आता 1 बॉलवर 1 रनची गरज होती. त्यावेळी केनने जोरात धाव घेत रन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो रनआऊट होता होता वाचला. त्यामुळे अनेकांनी त्याचं कौतूक केलंय.


केन विलियम्सन याचा Video -



काय म्हणाला Virender Sehwag ?


केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेलची (Daryl Mitchell) खेळी कमालीची होती. आजचा हा एक एपिक कसोटी सामना होता. न्यूझीलंडकडून चमकदार कामगिरी करत पुन्हा कसोटी क्रिकेट सर्वोत्तम असल्याचं सिद्ध करत आहे, असं सेहवाग (Virender Sehwag Tweet) म्हणाला आहे.


आणखी वाचा - IND vs AUS: LIVE सामन्यात Pujara ची अतरंगी बॉलिंग, लोकांना शेन वॉर्न आठवला, तर Ashwin म्हणतोय...


पाहा सेहवागचं ट्विट - 



दरम्यान, 2019 मध्ये ज्या न्यूझीलंडने भारताला फायनलमध्ये (WC 2019) जाण्यापासून रोखलं होतं. त्याच न्यूझीलंडने भारताला फायनलमध्ये पोहोचवल्याने सोशल मीडियावर अनेकांनी न्यूझीलंडचे आभार मानले आहेत. केनच्या निमित्ताने धोनीच्या (MS Dhoni) सेमीफायनलमधील रनआऊटची अनेकांना आठवण आली आहे.