WTC Final 2023 : निर्धारित 5 दिवसांत सामना निकाली निघालाच नाही तर विजेता कोण? पाहा ICC चा नियम काय सांगतो?
WTC Final 2023 : पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या टीमने 85 ओव्हर्समध्ये 327 रन्स केले. कोणत्या इतर कारणामुळे पाच दिवसांत सामना पूर्ण झाला नाही तर कोणत्या टीमला जेतेपद मिळणार हे आपण आज जाणून घेऊया
WTC Final 2023 : बुधवारपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसाठी हा निर्णय काहीसा फायदेशीर ठरल्याचं दिसलं. या सामन्याच्या पहिल्या दिवशी 85 ओव्हर्सचा खेळ झाला. पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या टीमने 85 ओव्हर्समध्ये 327 रन्स केले. अशा परिस्थितीत आता एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे, जर पाच दिवसांमध्ये खेळ पूर्ण होऊ शकला नाही, तर विजेता कोण ठरणार.
अनेकदा पावसामुळे टेस्ट सामन्यांचा एक दिवस वाया जातो. याशिवाय कोणत्या इतर कारणामुळे पाच दिवसांत सामना पूर्ण झाला नाही तर कोणत्या टीमला जेतेपद मिळणार हे आपण आज जाणून घेऊया.
पहिल्या दिवशी 85 ओव्हर्सचा खेळ
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्याचा पहिला दिवस हा कांगारूंचा ठरला. बुधवारी 3 विकेट्स गमावल्यानंतर ट्रेविस हेड आणि स्टीव स्मिथ यांनी भारतीय गोलंदाजांनी धुतलं. पहिला दिवस संपेपर्यंत ऑस्ट्रेलिया 327 रन्स अशा मजबूत स्थितीत होती. अशामध्येच जर एखाद्या दिवशी सामना होऊ शकला नाही रिझर्व डेला सामना होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय.
7 ते 11 जून ही काळात WTC अंतिम सामना होणर आहे. या निर्धारित पाच दिवसांमध्ये जर खेळ पूर्ण होऊ शकला नाही आणि सामन्याचा निकालही लागला नाही, त्यामुळे ICC ने 12 जून हा दिवस रिझर्व डे म्हणून ठेवलाय. त्यामुळे अशा परिस्थितीत 12 जूनचा दिवस सामन्यासाठी वापरण्यात येणार आहे.
सामना ड्रॉ झाला तर..
रिझर्व 'डे' च्या दिवशी जर सामन्याचा निर्णय झाला नाही आणि सामना अनिर्णित राहिला तर ICC च्या नियमांनुसार ट्रॉफी दोन्ही टीम्सना ही ट्रॉफी वाटून देण्यात येईल.
दोन्ही टीम्सची प्लेईंग 11 कशी आहे?
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.