WTC Final 2023 : इथे (IPL 2023) आयपीएलची स्पर्धा अंतिम फेरीपर्यंत पोहोचत नाही, तोच तिथे भारतीय संघातील काही खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षकांनी London ची वाट धरली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी सध्या भारतीय संघातील खेळाडू कसून मेहनत घेताना दिसत आहेत. विरोधी संघातील खेळाडू, त्यांची कमकुवत बाजू या सर्व गोष्टींवर काम करताना दिसत आहेत. मोकळा वेळ मिळाला तरीही ही मंडळी क्रिकेटच्याच अवतीभोवती असल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ तुम्हाहा हे जास्त चांगल्या पद्धतीनं दाखवू शकेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपलेल्या WTC Final साठी आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ प्रचंड मेहनत करताना दिसत आहेत. काही खेळाडू अजूनही इंग्लंडच्या वातावरणाशी एकरुप होताना दिसत आहेत. तर, काहींनी सरावही सुरु केला आहे. अशातच मैदानावरील काही खास क्षण बीसीसीआयही भारतीय क्रिकेट रसिकांच्या भेटीला आणत आहे. 


हेसुद्धा वाचा : IPL 2023 Qualifier 2 :  'आता तरी देवा मला...' हेच बोलला का तो?; मुंबईचा पराभव होऊनही सचिन- शुभमनच्या फोटोनं जिंकली मनं


नुकताच BCCI नं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अक्षर पटेल, आकाश दीप, मुकेश कुमार, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर एक पेचात पाडणारा खेळ खेळताना दिसत आहेत, त्यांच्यासोबत कोचिंग स्टाफमधील एक सदस्यही दिसत आहे. खेळ म्हणण्यापेक्षा ही त्यांची Fielding Practice आहे असंच म्हणावं लागेल. 


काय आहे हा खेळ? 


खरंतर भारतीय क्रिकेटपटूंनी खेळलेला हा खेळ तुम्हीही खेळू शकता. तसं त्यांच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही लिहिण्यात आलं आहे. यासाठी तुम्हाला फक्त पाच- सहा मित्रमंडळी आणि कमालीची एकाग्रता इतक्याचीच गरज आहे. साधारण वर्तुळाकाराच उभं राहत एकाच वेळी आपल्या समोरच्या किंवा बाजूच्या व्यक्तीकडे चेंडू फेकायचा आणि त्यानं तो पकडायचा. हे सर्वकाही अगदी लयबद्धरित्या पार पडलं तरच त्यात मजा येते, हेसुद्धा व्हिडीओ पाहताना लक्षात येत आहे. मग? या वीकेंडला खेळणार ना हा खेळ?



WTC Final 2023 ची काही खास वैशिष्ट्य 


बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 2-1 अशा फरकानं विजय मिळवल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियासोबत WTC Final खेळणार आहे. 7 जून रोजी या सामन्याची सुरुवात होणार असून, संपूर्ण क्रीडा जगताच्या इथं नजरा असतील. भारतीय संघातील जसप्रीत बुमराह, केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर असे खेळाडू संघात नसल्यामुळं त्यांची उणीव इतर खेळाडूंना भासेल, असं असलं तरीही अनुभवी खेळाडूंची संघात वर्णी लागल्यामुळं त्यांच्या कामगिरीवरही सर्वकाही अलंबून असेल हेच खरं.