Sara Tendulkar Shubman Gills WTC 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC Final) च्या अंतिम सामन्यासाठी सर्वच चाहता वर्ग उत्सुक झाला आहे. प्रत्येकजण या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ WTC च्या अंतिम फेरीत आमनेसामने येतील आहेत. 7 जून रोजी हा अटीतटीचा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची जोरदार तयारी सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच टीम इंडियाचा हॅण्डसम हंक शुभमन गिल (Shubman Gills) देखील आयपीएल (IPL 2023) संपवून सध्या इंग्लंडमध्ये आहे, तेथे तो 7 जूनपासून खेळल्या जाणाऱ्या wtc फायनलची तयारी करत आहे. याचदरम्यान सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शुभमन गिलचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोमुळे दोघांमध्ये असलेल्या रिलेशनशीपच्या चर्चा खऱ्या असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून शुभमन आणि सारा यांच्यात काहीतरी सुरू असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये आहे. आता या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. 


नेमकं खरं कारण काय?


सारा तेंडुलकरने हा फोटो ट्विट केलेला नाही. फोटो पोस्ट करणारे ट्विटर अकाउंट सारा तेंडुलकरचे फॅन अकाउंट आहे. त्यामुळे सारान शुभमनचा फोटो शेअर केलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. 



शुभमन गिलसाठी गेले काही महिने खूप चांगले गेले आहेत. त्याच्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. गिल केवळ त्याच्या कामगिरीमुळेच नाही तर त्याच्या नात्यामुळेही चर्चेत आहे.  सचिनची लेक सारा तेंडुलकर ही शुभमन गिलला डेट करत असल्याची चर्चा आहे. गिल नुकताच इंग्लंडसरा पोहोचला आहे. त्याचा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल झाला आहे. हा स्क्रीनशॉट साराचा सांगितला जात आहे. ज्यामध्ये ती इंग्लंडमध्ये पोहोचले आहे.


WTC Final साठी टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.


राखीव खेळाडू :  सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार


WTC Final साठी संघ ऑस्ट्रेलिया


पॅट कमिन्स (क), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.


राखीव खेळाडू: मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.