New Captain Announced: सर्वांना उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) चा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (London) मैदानावर खेळवला जाईल. अशातच आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final)  फायनलच्या एक दिवस अगोदरच एका टीमचा कॅप्टन अचानक बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात देखील मोठी खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. 14 जून ते 18 जून या कालावधीत होणाऱ्या एका कसोटी सामन्यासाठी 15 सदस्यीय बांग्लादेश क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. याच संघाची घोषणा करताना एकमेव कसोटी सामन्यासाठी लिटन दासला बांग्लादेशी संघाचा कसोटी कर्णधार बनवलं आहे. 


कॅप्टन का बदलला?


बांग्लादेशचा नियमित कसोटी कर्णधार शकिब अल हसन दुखापतग्रस्त असल्याने लिटन दासकडे कसोटीची कॅप्टन्सी देण्यात आलीये. लिटन दास हा बांगलादेश क्रिकेट संघाचा बारावा कसोटी कर्णधार ठरलाय. बांग्लादेशने या कसोटीसाठी काही मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार अनकॅप्ड शहादत हुसेन आणि मुशफिक हसन यांना संधी देण्यात आली आहे.


कसा असेल बांग्लादेशचा संघ?


लिटन दास (कर्णधार), तमीम इक्बाल, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, मोमिनुल हक शोराब, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, सय्यद खालिद अहमद, इबादत हुसेन चौधरी, तस्किन अहमद, शोरफुल इस्लाम, महमुदुल हसन जॉय, शाहद हसन जॉय. दीपू, मुशफिक हसना.


आणखी वाचा - अर्जून तेंडूलकरनंतर आता विरेंद्र सेहवागचा लेक IPL डेब्यूच्या तयारीत, बापासारखा तगडा बॅटर; पाहा Video


दरम्यान, कसोटी सामन्यासाठी 5 महिन्यानंतर झाकीर हसनचे बांगलादेश संघात पुनरागमन झालंय. झाकीर हसनने डिसेंबर 2022 मध्ये भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आता तो अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे आता त्याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल.