WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी (WTC Final 2023) आता केवळ तीन महिन्यांचा वेळ बाकी आहे. ज्यासाठी आता टीम इंडिया (Team India) आणि श्रीलंका (Sri Lanka Team) यांच्यामध्ये फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये आता ऑस्ट्रेलियाच्या टीमने त्यांनी त्यांची जागा पक्की केली आहे. इंदूरच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने (Australia Team) एन्ट्री पक्की केली. मात्र या पराभवामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे भारत WTC Final 2023 खेळू शकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आलं आहे. 


WTC Final 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचं स्थान पक्कं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असून टीम इंडिया 2-1 अशी आघाडीवर आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्याचं स्वप्न भंगलं जाऊ शकतं. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या टीमने या विजयासह फायनलमध्ये स्थान पक्कं केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात आता 68.52 पॉईंट्स झाले आहेत. 


WTC 2023 Final कशी गाठणार आता टीम इंडिया?


तिसऱ्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवामुळे फायनल गाठणं आता खडतर झालं आहे. मात्र यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे, टीम इंडियाकडे फायनल गाठण्यासाठी एक आशा आहे. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अजून चौथा सामना होणं बाकी आहे. WTC तिकीट मिळवण्यासाठी, ऑस्ट्रेलियाविरूद्धची चौथी टेस्ट जिंकावी लागणार आहे. 


जर चौथी टेस्ट ड्रॉ झाली तर?


मात्र बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथी टेस्ट ड्रॉ झाली तर भारताला श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या टेस्ट सिरीजच्या निर्णयावर अवलंबून रहावं लागणार आहे. जर न्यूझीलंडने ही सिरीज जिंकली किंवा ड्रॉ केली तर भारताला फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. 


श्रीलंका अजूनही फायनलच्या शर्यतीत


भारताव्यतिरिक्त श्रीलंकेच्या टीमला देखील अजूनही अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी आहे. या महिन्यामध्ये टीमला न्यूझीलंडच्या भूमीवर 2 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळावायची आहे. श्रीलंकेने ही सिरीज 2-0 ने जिंकली तर त्यांना फायलनचं तिकीट मिळू शकणार आहे. मात्र न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये न्यूझीलंडच्या टीमचं पारडं जड मानलं जातंय.