WTC Points Table: पाकिस्तानच्या विजयाने भारताचं गणित फिस्कटलं; पाहा कसं बदललं समीकरण
WTC Points Table : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं हे तिसरं सत्र असून यामध्ये पाकिस्तानने मात्र टीम इंडियाला ( Team India ) मोठा धक्का दिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) या तिसऱ्या सत्राच्या पॉईंट्स टेबलमध्ये ( WTC Points Table ) मोठा बदल झाला आहे.
WTC Points Table : नुकतंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ( ICC World Test Championship ) फायनल रंगली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. त्यानंतर एशेज सिरीजपासून नव्या वर्ल्ड टेस्टच्या ( ICC World Test Championship ) चक्राला सुरुवात झाली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं हे तिसरं सत्र असून यामध्ये पाकिस्तानने मात्र टीम इंडियाला ( Team India ) मोठा धक्का दिला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) या तिसऱ्या सत्राच्या पॉईंट्स टेबलमध्ये ( WTC Points Table ) मोठा बदल झाला आहे. यावेळी भारत, पाकिस्तान, वेस्टइंडिज, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड टेस्ट क्रिकेट खेळतायत. त्यामुळे या 6 टीम्समध्ये मोठी लढाई सुरु आहे.
पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका ( SL vs PAK ) यांच्यामध्ये टेस्ट सिरीज सुरु होती. 2 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये पाकिस्तानने मायदेशात श्रीलंकेचा धुव्वा उडवला. यासोबत भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( Ind vs Wi ) यांच्यातही 2 सामन्यांची टेस्ट सिरीज झाली असून भारताने वेस्ट इंडिजचा 1 सामन्यात पराभव केला. दरम्यान पाकिस्तानच्या या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ( ICC World Test Championship ) भारताला मोठं नुकसान झालंय.
पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान अव्वल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) सिझनमध्ये पाकिस्तान अव्वल आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील या पाकने दोन्ही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावलंय. दुसरीकडे वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा टेस्ट सामना पावसामुळे रद्द झाल्याने टीम इंडिया 66.67 टक्के गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलीये.
भारता खालोखाल तिसऱ्या नंबरवर ऑस्ट्रेलिया (54.17) आणि चौथ्या क्रमांकावर इंग्लंड (29.17) या टीम्स आहेत. या दोन टीम्समध्ये अॅशेस 2023 चा शेवटचा सामना खेळला जातोय. यानंतर भारताविरूद्धची दुसरी टेस्ट ड्रॉ झाल्याने वेस्ट इंडिजच्या खात्यातही काही पॉईंट्स जमा झालेत. यावेळी तळाला श्रीलंकेची टीम आहे.
पाकिस्तानकडून श्रीलंकेचा धुव्वा
सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ( WTC Points Table ) सिझनमध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला घरच्या मैदानावर 2 सामन्यात पराभव केल्याने ते पॉईंट्स टेबलवर अव्वल स्थानावर पोहोचलीये. 27 जुलै रोजी संपलेल्या टेस्ट सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा एक डाव आणि 222 रन्सने पराभव केला.