ICC World Test Championship Points Table : यजमान वेस्ट इंडिज आणि साऊथ अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळवला होता. मात्र, हा सामना ड्रॉ झाल्याने कोणत्याच संघाला आघाडी घेता आली नाही. सामना अनिर्णयीत राहिल्याने वेस्ट इंडिज आणि साऊथ अफ्रिका यांना प्रत्येकी 4-4 गुण मिळाले. 4 गुण मिळाले असले तरी वेस्ट इंडिजला कोणताही फायदा झाला नाही. वेस्ट इंडिजचा संघ अजूनही पाईंट्स टेबलच्या तळाशी आहे. पण या सामन्यानंतर टीम इंडियाचं अव्वल स्थान अजूनही कायम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार गुणांसह यजमान वेस्ट इंडिज एकूण 20 गुणांसह तळाच्या अखेरच्या म्हणजेच नवव्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका 16 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमधील रँकिंग टक्केवारीच्या आधारे ठरवली जात असल्याने वेस्ट इंडिजला तळ सोडता आला नाही. तर साऊथ अफ्रिकेला देखील काही खास फायदा झाला नाही. दोघांच्या रँकिंगमध्ये कोणताही फरक झाला नसला तरी गुणांमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. 


साऊथ अफ्रिकेला पाच पैकी एक सामना जिंकता आलाय. तर त्यांनी 3 सामने गमावले आहेत. तसेच एका सामन्याचा निकाल निकाल लागू शकला नाही. तर वेस्ट इंडिजची परिस्थिती आणखी वाईट असून 8 पैकी 1 सामनाच त्यांना नावावर करता आलाय. तर 5 सामन्यात त्यांना दारुण पराभव स्विकारावा लागलाय. एवढंच नाही तर त्यांचे दोन सामने ड्रॉ झाले आहेत. 


टीम इंडिया टॉपवर


टीम इंडिया सध्या 74 गुणांसह टॉपवर आहे. टीम इंडियाने 9 सामन्यांमध्ये 6 विजय नोंदवले आहेत. तर दोन सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. तसेच 1 सामना भारताचा ड्रॉ झाला आहे. भारताची विनिंग टक्केवारी 68.52 आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची टक्केवारी 62.50 आहे.



बांगलादेशविरुद्ध भारताचा संभाव्य स्कॉड


रोहित शर्मा (C), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान (WK), ऋषभ पंत (WK), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.