नवी दिल्ली : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये विजयी चौकार ठोकल्यानंतर भारतीय संघ आज द. आफ्रिकेशी दोन हात करण्यास सज्ज झालीये. दुपारी तीन वाजल्यापासून भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील सामन्याला सुरुवात होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आज लीसेस्टर मैदानावर द. आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. स्टार स्पोर्ट्सवर तुम्ही ही मॅच लाईव्ह पाहू शकता. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होईल. तसेच हॉटस्टारवरही तुम्ही हा सामना पाहू शकता. 


पॉईंटटेबलमध्ये भारत दुसऱ्या स्थानी


इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज या चार संघाना हरवल्यानंतर भारतीय संघ पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे. तर दक्षिण आफ्रिका या पॉईंटटेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे.