मुंबई : पुन्हा एकदा डब्लूडब्लूई आणि त्याचा मालक चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंटचे मालक आणि सीईओ विन्स मॅक्मोहन यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने त्यांच्या लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. बोका रॅटन येथे असलेल्या ट्रेनिंग सलूनमधील कर्मचारी हा आरोप आहे की, मॅक्मोहनने 2006 मध्ये त्याने तिला किस करून घाणेरड्या नजरेने पाहिले. 


पोलिस या प्रकरणात मॅक्मोहनला अटक करू इच्छित असून योग्य ती कारवाई करणार आहे. फ्लोरिडाकडे असलेल्या अपूर्ण पुराव्यांमुळे या प्रकरणावर गुन्हा दाखल झाला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की, मॅक्मोहन हे दोषीत ठरल्याशिवाय गुन्हा दाखल करणं चुकीचे आहे. 


दुसरीकडे डब्लूडब्लूईच्या सीईओंनी महिलेचे आरोप फेटाळले आहेत. संबंधित महिला घटनेच्या दिवशी मॅक्मोहन यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे गेली होती. तिच्या आरोपानुसार, "जानेवारी 2006 मध्ये मॅक्मोहन तंजाबार टॅनिंग सलूनमध्ये संध्याकाळी पाच वाजता आले होते. त्यावेळी ते 60 वर्षांचे असावेत. मॅक्मोहन यांनी महिलेला स्वत:चे न्यूड आणि सेमी न्यूड फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला. "यानंतर मॅक्मोहन यांनी मला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला. वेळी मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे, असंही त्यांना सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही," असा दावा महिलेने केला आहे.


मॅक्मोहनने या प्रकरणानंतर सलूनमधील दुसऱ्या कर्मचाऱ्याशी चर्चा केली आणि दुसऱ्या खोलीत मसाज करण्यासाठी गेला. पार्लरमधील महिलेचा आरोप आहे की, मॅक्मोहन हे दुसऱ्या मुलीला घेऊन गेले. तेथे त्यांनी तिला किस केलं असून घाणेरड्या नजरेने पाहिले.