नवी दिल्ली : जॉन सीनाचे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येते डब्ल्यूडब्ल्यूई. पण, जॉन सीना आणि क्रिकेट असे समिकरण मांडले तर? गोंधळ नक्कीच होणार. बरोबर ना? पण, हे समिकरण वास्तवात उतरले आहे. जॉन सीनाने क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवले आणि क्रिकेटपटू शेन वॉटसनकडून क्रिकेटचे धडेही घेतले.


जॉन सीना क्रिकेटच्या मैदानावर कसा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉन सीनाच्या क्रिकेट मैदानावरील प्रवेशासाठी निमित्त ठरला तो सीनावरील चित्रपट. सीनाच्या जीवनावर आधारीत "Ferdinand " नावाच चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनामध्ये सीना सध्या व्यग्र आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सीना ऑस्ट्रेलियातही पोहोचला. या वेळी त्याने क्रिकेटटर शेन वॉटसनसोबत संवाद साधला आणि त्याच्याकडून क्रिकेटचे धडेही घेतले.


सीना फारच वाईट क्रिकेट खेळतो


जॉन सीनाने शेन वॉटसन कडून क्रिकेटचे धडे घेतले तेव्हा मुलांनीही तेथे गर्दी केली होती. या वेळी सीनाने सांगितले की, मी एकदा क्रिकेट खेळलो आहे. पण, मी फारच वाईट क्रिकेट खेळतो, असे सांगतानाच सध्या आपण चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहोत असेही सीनाने सांगितले.


वॉटसनने फोटो केला शेअर


दरम्यान, वॉटसनने आपल्या ट्विटर हॅडलवर जॉन सीनासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात सीनाच्या हातात बॅट दिसत आहे. वॉटसनने आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, या चॅम्पीयनसाठी सर्वात बेस्ट बॅट.



सीना हॉलिवूडमध्ये नाव कमावण्याच्या प्रयत्नात


जॉन सीना हा डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमध्ये सर्वाईवर सीरीजमध्ये टीम ब्ल्यूकडून खेळताना शेवटचा दिसला होता. या वेळी कर्ट एंगलने सीनाला एलिमिनेट केले होते. दरम्यान, सीना सध्या रींगबाहेर आहे आणि हॉलिवूडमध्ये आपले नाव कमावण्याच्या प्रयत्नात आहे.