WWE रेसलर ट्रिपल एचनं दिलं रोहित शर्माला खास गिफ्ट
रेसलिंगच्या जगतातील बादशाह आणि WWE चा COO ट्रीपल एचने क्रिकेटर रोहत शर्माला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. ट्रिपल एचने मुंबई इंडियंसला तिसऱ्यांदा आयपीएलचा खिताब आपल्या नावे केल्याने एक खास चँपियनशिप बेल्ट गिफ्ट केला आहे.
मुंबई : रेसलिंगच्या जगतातील बादशाह आणि WWE चा COO ट्रीपल एचने क्रिकेटर रोहत शर्माला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. ट्रिपल एचने मुंबई इंडियंसला तिसऱ्यांदा आयपीएलचा खिताब आपल्या नावे केल्याने एक खास चँपियनशिप बेल्ट गिफ्ट केला आहे.
याआधी आयपीएल १० मध्ये फायनलमध्ये जिंकणाऱ्या मुंबई इंडियंसला ट्रिपल एचने ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या. WWE मुंबई इंडियंससाठी एक खास भेट पाठवत आहे. त्याने म्हटल्यानुसार ट्रिपल एचने १३ जुलैला बेल्टचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आणि म्हटलं WWE चँपियनशिप बेल्ट रास्त्यात आहे.
WWE बेल्ट मिळल्यानंतर रोहित शर्मा उत्साहित दिसत आहे. त्याने ट्रिपल एचला धन्यवाद म्हणत बेल्टसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्याने म्हटलं की, 'एक चॅम्पियनद्वार पाठवलेला चॅम्पियनशिप बेल्ट उचलणं एक अद्भुत गोष्ट आहे. धन्यवाद ट्रिपल एच.'