Yashasvi Jaiswal set to make T20I debut: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी-ट्वेंटी (IND vs WI 3rd T20I) सामन्यात रोहित शर्माने हुकमी एक्का बाहेर काढला आहे. वेस्ट इंडीजने जिंकली नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजचा कॅप्टन रोव्हमन पॉवेल याने फलंदाजीचा निर्णय घेतल्याने आता सामन्यात गोलंदाजीचा कस लागणार आहे. तिसऱ्या सामन्यात सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याला संधी देण्यात आली आहे. यशस्वी जयस्वालासाठी हा डेब्यू सामना असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेत भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. टीम इंडियाला पहिल्या दोन सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आता टीम इंडियासाठी करो या मरो असा सामना असणार आहे. या सामना जिंकून लाज राखण्याची टीम इंडिया मैदानात उतरेल.



आणखी वाचा - 'धोनी चांगला कॅप्टन होता, पण...' युवराज सिंहने टीम इंडियाला दाखवला आरसा, म्हणतो 'वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...'


भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (C), संजू सॅमसन (WC), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.


वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (WC), रोव्हमन पॉवेल (C), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.