Yashasvi Jaiswal – Ruturaj Gaikwad: वर्ल्डकपनंतरच्या पराभवानंतर टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सिरीजला अखेर सुरुवात झाली. गुरुवारी संध्याकाळी पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 2 विकेट्सने विजय झाला. यावेळी कर्णधार सूर्याकुमार यादवने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 208 रन्सच्या लक्ष्याचा स्कोरचा पाठलाग करताना टीम इंडियाकडून इशान ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरले होते. दरम्यान या दोघांमध्ये झालेल्या चुकीमुळे टीम इंडियाला एक विकेट गमवावा लागली. यावेळी कांगारूंकडून गोलंदाजी करताना मार्कस स्टॉयनिसने जयस्वालला डिवचल्याचं दिसून आलं.


Yashasvi Jaiswal ने गायकवाडला केलं रनआऊट


ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सलामीला आले होते. जयस्वालने पहिल्याच ओव्हरमध्ये फोर आणि सिक्स मारले. यानंतर यशस्वी जयस्वालने फाइन लेगवर स्लो शॉर्ट बॉल खेळला. यावेळी त्याने एकेरी रन सहज पूर्ण केला आणि दुसरा रन घेण्यासाठी धावला. मात्र यावेळी विकेट जाऊ शकते हे त्याच्या लक्षात आल्यावर गोंधळ उडाला आणि त्याने कॉल मागे घेतला. 


मात्र कॉल मागे घेईपर्यंत उशीर झाला होता. कारण ऋतुराज गायकवाड क्रिझ सोडून बराच पुढे आला होता. अशावेळी त्याला पुन्हा परतणं कठीण होतं. त्यामुळे ऋतुराज एकंही बॉल न खेळता रनआऊट झाला. या घटनेनंतर जयस्वालने ऋतुराजला धोका दिल्याचं म्हटलं आहे. 


मार्कस स्टॉयनिलने डिवचलं


यशस्वी जयस्वालने ऋतुराजला रन आऊट केल्यानंतर भारतीय फलंदाज चांगलेच संतापले. यावेळी स्वतःची चूक असल्याचं जयस्वालच्या लक्षात आलं. यादरम्यान कांगारू बॉलर मार्कस स्टॉइनिस मुद्दाम यशस्वीसमोर उभा राहिला आणि जोरात हसायला लागला. स्टॉयनिसची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.