मुंबई: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या (T20 Blast 2021) मधील उत्तर गटात लंकाशायर आणि यॉर्कशायर संघ एकमेकांविरुद्ध खेळत होते. या सामन्यात जो रुटच्या नेतृत्वात यॉर्कशायरने दाखविलेल्या क्रीकेटपटूने चाहत्यांचं मनं जिंकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यॉर्कशायरने दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी लंकाशायर टीमला शेवटच्या 15 धावांची गरज होती. त्यावेळी ल्यूक वेल्स आणि स्टीवन क्रॉफ्ट क्रीझवर खेळत होते. 18ओव्हरमध्ये पहिला चेंडू आला आणि फलंदाज ल्यूक वेल्सने शॉट खेळत धावा काढण्यासाठी पुढे गेला. दुसऱ्या बाजूने स्टीवन क्रॉफ्ट रन काढण्यासाठी येत होता मात्र अचानत त्याच्या पायात दुखापत होऊ लागली आणि तो खाली कोसळला. 



स्टीवन क्रॉफ्टच्या पायात क्रॅम्प आल्यासारखं झालं. तो कळवळत खाली कोसळला. त्यावेळी जे विरुद्ध टीमने केलं त्यामुळे चाहत्यांची मन या संघाने जिंकली आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


जेव्हा तो खाली कोसळला तेव्हा त्याचा रन देखील अर्धवट राहिला होताय विरुद्ध संघाला आऊट करण्याची संधी होती. मात्र यॉर्कशायर टीमने या संधीचा फायदा घेतला नाही. तर त्या फलंदाजाला सपोर्ट केला. त्यामुळे विरुद्ध संघातील खेळाडूंचं खूप कौतुक होत आहे. जो रूटने आपल्या संघाला आऊट करू नये असं सांगितलं. त्यामुळे या बॉलला डेड बॉल जाहीर करण्यात आलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.