IND vs WI : तू थांब मी मारतो...; भर मैदानात तिलकने सूर्याची केली बोलती बंद
IND vs WI : तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्माच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यावेळी तिलक वर्मा ( Tilak Varma ) ने दिलेल्या एका उत्तराने सर्वचजण हैराण झालेत.
IND vs WI : वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) कमबॅक करत विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) 7 विकेट्सने वेस्ट इंडिजचा पराभव केला. या सामन्याचा खरा शिल्पकार ठरला तो सुर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ). सुर्यकुमारसोबत तिलक वर्मा ( Tilak Varma ) ने देखील उत्तम कामगिरी केली. दरम्यान सामन्यानंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्माच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यावेळी तिलक वर्मा ( Tilak Varma ) ने दिलेल्या एका उत्तराने सर्वचजण हैराण झालेत.
सूर्या आणि तिलकचा इंटरव्ह्यू व्हायरल
सामना जिंकल्यानंतर बीसीसीआयने ( BCCI ) एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये सूर्या आणि तिलक एकमेकांशी मस्करीच्या मूडमध्ये दिसून आले. यावेळी सूर्याने तिलकला विचारलं की, तुझ्या आजच्या खेळीबद्दल प्रेक्षकांना काय सांगशिल?
यावेळी तिलक वर्मा ( Tilak Varma ) ने सांगितलं की, जास्त नाही पण मी माझी फलंदाजी खूप एन्जॉय केली. समोरून भाईची ( सूर्याची ) फलंदाजी पाहत होतो. विकेट थोडी स्लो होती, मात्र तरीही सूर्याच्या बॅटमधून भरपूर रन्स निघत होते.
सूर्याच्या प्रश्नावर तिलकचं गमतीशीर उत्तर
यानंतर सूर्याने तिलक ( Tilak Varma ) ला विचारलं की, जेव्हा मी तुला सांगितलं की, तू थोडं थांब...मी मारतो...तेव्हा तुला काही वाटलं नाही ना, हा इतका का बोलतोय? तुला वाईट वाटलं नाही ना?
या प्रश्नाचं उत्तर देताना तिलकनेच सूर्यावर गुगली टाकली. यावेळी तिलक म्हणाला की, असं तर काही तू म्हणाला नाहीस, तुझं पहिल्याच बॉलपासून सुरु ( चांगली खेळी ) होती.
यानंतर तिलक वर्माने सूर्याचा इंटरव्ह्यू घेत त्याला प्रश्न केला. तिलकने सूर्याला विचारलं की, तू काही वेळ घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला होता मग पहिल्याच बॉलपासून अटॅक करण्याचा निर्णय अचानक का घेतला.
याला मजेशीर उत्तर देताना सूर्या ( Suryakumar Yadav ) म्हणाला की, कधी-कधी आपल्या स्वतःलाच ब्लफ करणं जरूरी असतं. आज मी स्वतःलाचा उल्लू बनवलं. मी विचार केला होता की, थोडा वेळ घेऊन खेळेन आणि मधल्या ओव्हरमध्ये आक्रमक खेळ करेन. पण सुरुवातीचे 2 बॉल खेळल्यानंतर मला वाटलं की, टीमला जशी गरज आहे, त्यानुसार खेळलं पाहिजे. काही वेगळं करायची गरज नाही.
भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात गयानामध्ये तिसरा T20 सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 5 गडी गमावून 159 रन्स केले. या सामन्यात भारताने 17.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 164 रन्स करत सामना जिंकला. यावेळी भारताकडून सूर्यकुमार यादव (83) आणि तिलक वर्मा (49*) रन्स केले. सामन्यानंतर सूर्यकुमारला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात आला.