मुंबई : क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या लग्नाचे ग्रॅंड रिसेप्शन अलीकडेच पार पडले. या रिसेप्शनला क्रिकेट आणि बॉलिवूड अनेक खेळाडू, कलाकारांनी हजेरी लावली. 


युवराज सिंग आणि आशिष नेहराचा डान्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झहीर खानच्या लग्नातला अनुष्का-विराटचा डान्स व्हिडिओ भलताच व्हायरल झाला. त्यानंतर आता युवराज सिंग आणि आशिष नेहराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.


व्हायरल व्हिडिओ 


पटियाला पेग या पंजाबी गाण्यावर युवराज आणि आशिषने ठेका धरला. त्याचबरोबर सागरिकालाही आग्रहानं डान्स करायला लावला. खेळाडूंच्या या डान्स मस्तीने रिसेप्शनला चांगलीच रंगत आणली.