नवी दिल्‍ली : श्रीलंकेसोबत होत असलेल्या वनडे सीरीजसाठी युवराज सिंह आणि सुरेश रैना यांची निवड करण्यात आली नाही. या दोघांची निवड का करण्यात आली नाही, याचं नेमकं कारण समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला नेहमीच वेगवेगळ्या फिटनेस टेस्टमधून जावं लागतं. या टेस्टमध्ये ‘यो-यो’ ही टेस्ट सर्वात महत्वपूर्ण आहे. या टेस्टमुळेच सध्याची टीम इंडिया सर्वात फिट टीम मानली जाते. मात्र, या टेस्टमध्ये युवराज आणि रैना फेल झालेत. 


फिटनेस टेस्टच्या सीरीजमध्ये प्रत्येक खेळाडूला ही टेस्ट द्यावी लागते. या टेस्टमध्ये १९.५ पेक्षा जास्त स्कोर करणं गरजेचं असतं. या टेस्टमध्ये विराट कोहलीचा स्कोर २१ इतका होता, तर युवराज आणि रैना या दोघांचं टेस्टमधील प्रदर्शन फारच वाईट होतं. युवराज या टेस्टचा स्कोर १६ होता. 
 
टीम इंडियात विराट, रवींद्र जडेजा, मनीष पांडे लगातार हा स्कोर मिळवत आहेत. तर इतर खेळाडूंचा स्कोर कधी १९.५ असतो तर कधी जास्त असतो. आता टीम इंडियाच्या फिटनेसबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. 


कशी करतात ही टेस्ट ?


खेळाडूंचं फिटनेस जाणून घेण्यासाठी ‘यो-यो’ टेस्ट ‘बीप’ टेस्टचं अ‍ॅडव्हांस व्हर्जन आहे. २०-२० मीटर लांबीवर दोन लाईन आखून कोन ठेवले जातात. एका टोकाच्या लाईनवर खेळाडूचा पाय मागच्या बाजूला असतो आणि दुसरीकडे तो धावायला सुरूवात करतो. प्रत्येक मिनिटानंतर वेग वाढवायचा असतो आणि जर खेळाडू लाईनपर्यंत पोहोचला नाहीतर त्याला दोन बीप्सच्या आत लाईनपर्यंत पोहोचायचं असतं. तसे न झाल्यास त्या खेळाडूला फेल मानलं जातं. 


दरम्यान, आधी खेळाडूंना टॅलेंटच्या आधारावर निवडलं जायचं, मात्र आता फिटनेसवरही तितकच लक्ष दिलं जातं. युवराज आणि रैना टीम इंडियाच्या सर्वोत्तम फिल्डर्सपैकी मानले जातात. बीसीसीआयच्या एका अधिका-याने सांगितलं की, ‘९० च्या दशकात मोहम्मद अझरूद्दीन, रॉबिन सिंह आणि अजय जडेजा सोडून इतर खेळाडूंना १६-१६.५ चा स्कोर करावा लागत होता. आता विराट कोहलीने नवा बेंचमार्क करण्याच्या तयारीत आहे. जो ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीम सेट केला आहे.