नवी दिल्ली : टीम इंडियाचा धमाकेदार खेळाडू युवराज सिंह भलेही टीमच्या बाहेर असेल पण त्याच्या लोकप्रियतेत जराही कमतरता झाली नाही. युवराज पुन्हा टीममध्ये जागा मिळवण्यासाठी मेहनत करत आहे. पण नुकत्याच झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो पास होऊ शकला नाही. मात्र त्याला लवकरात लवकर त्याच्या चाहत्यांना टीममध्ये पहायचं आहे. 


१२ डिसेंबरला युवराजचा बर्थडे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्या म्हणजेच १२ डिसेंबरला युवराज सिंह याचा वाढदिवस आहे. जन्मदिवसाच्या एक दिवसआधी त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. सध्या या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर ४ तासातच दीड लाखपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.


सिक्स पॅकची इच्छा


युवराज हा फोटो शेअर करुन लिहिले आहे की, बर्थडेसाठी सिक्स पॅक ट्राय करत आहे. जहीर, हरभजन आणि रोहित तुम्हाला काय वाटतं? एका दिवसात येतील का? असे त्याने विचारले आहे. युवराजच्या अनेक चाहत्यांनीही या फोटोवर कमेंट करणे सुरू केले. 


याआधीही युवराजने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला होता. या फोटोवरही रोहित शर्मा आणि हरभजन सिंहने गमतीदार कमेंट केले होते. यावर हरभजन सिंहने युवराजला गमतीने सल्लू भाऊ म्हटले होते.