`मी पुन्हा टीम इंडियामध्ये...`, अखेर युवराज सिंगने व्यक्त केली मनातली खदखद, रोहित अन् हार्दिकला थेटच बोलला!
India National Cricket Team : जे काही असेल तो रोखठोक, असाच तोरा युवराजचा राहिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना युवराज सिंगने मनातील खंत बोलून दाखवली. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं देखील तोंडभरून कौतूक केलंय.
Yuvraj Singh hints On mentoring role : भारतीय क्रिकेट इतिहासातील व्हाईट बॉल क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणजे युवराज सिंग...! टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देण्यात सर्वात जास्त योगदान असलेला युवराज आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असतो. जे काही असेल तो रोखठोक, असाच तोरा युवराजचा राहिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना युवराज सिंगने मनातील खंत बोलून दाखवली. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं देखील तोंडभरून कौतूक केलंय. 'एकच खंत आहे की, मी आणखी कसोटी खेळू शकलो नाही. मी 40 कसोटी खेळलो आणि 45 कसोटीत 12 वा खेळाडू होतो', असं म्हणत युवराज सिंगने मनातली खदखद व्यक्त केली.
मानसिकदृष्ट्या तयार व्हा..!
पुढील आव्हानांसाठी भारतीय क्रिकेट संघाला मानसिकदृष्ट्या तयार करण्यासाठी भविष्यात मेंटॉरची भूमिका बजावू इच्छितो. मला वाटतं की आम्ही खूप फायनल खेळलो पण एकही जिंकू शकलो नाही. आम्हाला येत्या काही वर्षांत यावर नक्कीच काम करावे लागेल. एक देश म्हणून आणि भारतीय संघ म्हणून आम्हाला दबावाखाली चांगली कामगिरी करावी लागेल. जेव्हा मोठा सामना असतो तेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या तयार असतो परंतु मानसिकदृष्ट्या आपल्याला मजबूत असणे आवश्यक आहे. आमच्याकडे असे खेळाडू आहेत जे दबावाखाली फलंदाजी करू शकतात पण एक-दोन खेळाडूंनी नाही तर संपूर्ण संघाने ते केले पाहिजे, असं मत युवराज सिंह याने व्यक्त केलं आहे.
रोहित महान कर्णधार
मी म्हणू शकतो की रोहित एक महान कर्णधार आहे, त्याच्याकडे पाच आयपीएल ट्रॉफी आहेत, त्याने आपल्याला विश्वचषकच्या अंतिम फेरीत नेलं. तो आयपीएल आणि भारतातील आमच्या महान कर्णधारांपैकी एक आहे. तुम्हाला वर्क लोडचा भार सांभाळायचा असतो, असं म्हणत त्याने रोहित शर्माचं कौतूक केलंय. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन कोण असावा? असा सवाल जेव्हा युवराजला विचारला गेला, तेव्हा 'सध्या हार्दिकच्या फिटनेसची काय स्थिती आहे हे मला माहीत नाही. निवडकर्त्यांचा तो कॉल आहे', असं मत युवराजने व्यक्त केलंय.
दरम्यान, रोहित जेव्हाही मुंबई इंडियन्सकडून खेळला तेव्हा हार्दिककडून सर्वोत्तम कामगिरी करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे, विशेषत: त्याच्या वर्कलोडचे व्यवस्थापन करण्यासाठी त्याच्या गोलंदाजीच्या बाबतीत तो अव्वल ठरलाय. रोहित आणि हार्दिकमध्ये असं काही प्रतिष्ठेचं असेल असं मला वाटत नाही. मात्र, जेव्हा कर्तृत्व आणि इगोमध्ये येतो तेव्हा एकत्र बसून खेळाडूंनी बोललं पाहिजे, असा सल्ला युवराज सिंगने तरुण खेळाडूंना दिला आहे.