सिक्सर किंग युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
युवराज सिंगने केली निवृत्तीची घोषणा
मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. युवराज सिंगने त्याच्या खेळाने टीम इंडियाला २८ वर्षांनतर वर्ल्डकप जिंकवून दिला होता. २०११ चा वर्ल्डकप जिंकवून देण्यात युवराजचा मोठा वाटा राहिला होता. त्याच्या ऑलराऊंडर खेळीसाठी त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते.
युवराज सिंगने २००७ च्या पहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये मारलेले ६ सिक्स प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या आजही लक्षात आहेत. आजही तो व्हिडिओ अनेकांकडून पाहीला जातो. इंग्लंडच्या एंड्र्यू फ्लिंटॉफने डिवचल्यानंतर त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या ६ बॉलवर ६ सिक्स मारले होते.
युवराजने मानले आभार
निवृत्ती जाहीर करताना युवराजला अश्रू अनावर झाले होते. त्याने प्रत्येक क्रिकेट चाहत्यांचे तसेच टीम इंडियाच्या निवड समितीच्या सदस्यांचे आभार मानले. यावेळी त्याने चंदू बोर्डे, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, लक्ष्मण, गांगुली, सेहवाग, गंभीर, धोनी यांचे देखील आभार मानले.ॉ
टी-२० कारकिर्द
क्रिकेटच्या झटपट प्रकारात म्हणजेच टी-२० मध्ये अनेक रेकॉर्ड युवराजने केले. टी-२० कारकिर्दीत युवराजने ५८ मॅच खेळल्या. यात त्याने ११७७ रने केले. २००७ च्या वर्ल्ड कपमध्ये ६ बॉलमध्ये ठोकलेले ६ सिक्स अजूनही प्रत्येकाला आठवणीत आहेत.
वनडे कारकिर्द
युवराजने वनडे क्रिकेटमध्ये केनिया विरुद्ध ३ ऑक्टोबर २००० साली पदार्पण केले होते. त्याने वनडे कारकिर्दीत ३०४ मॅच खेळल्या आहेत. यात त्याने ८७०१ रन केले. युवराजच्या वनडे कारकिर्दीत १४ शतकं आणि ५२ अर्धशतकांचा समावेश होता. युवराजने आपल्या कारकिर्दीतील अखेरची वनडे मॅच ३० जून २०१७ ला खेळला होता. ही मॅच वेस्टइंडिज विरुद्ध खेळण्यात आली होती.
टेस्ट कारकिर्द
युवराजने १६ ऑक्टोबर २००३ साली टेस्ट कारकिर्दीत न्यूझीलंड विरुद्ध डेब्यू केले होते. युवराजने आपल्या टेस्ट कारकरिर्दीत ४० मॅच खेळल्या आहेत. यात त्याने १९०० रन केले. यात ३ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. युवराजला आपल्या टेस्ट कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.
टी२० कारकिर्द
क्रिकेटच्या झटपट प्रकारात म्हणजेच टी-२० मध्ये युवराजने अनेक रेकॉर्ड केले आहेत. टी-२० कारकिर्दीत युवराजने ५८ सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण ११७७ रने केले आहेत.