मुंबई : भारताला २०११ वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या युवराज सिंगने त्याच्या बायोपिकविषयीची इच्छा बोलून दाखवली आहे. जर माझ्यावर बायोपिक बनवण्यात येत असेल, तर सिद्धांत चतुर्वेदीने माझी भूमिका करावी, असं युवराज म्हणाला आहे. २०११ साली धोनीच्या नेतृत्वात भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कपमध्ये कॅन्सर असूनही युवराज सिंग खेळला होता. एवढच नाही तर त्याने मॅन ऑफ द टुर्नामेंटचा किताबही पटकावला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इंग्रजी वृत्तपत्राला युवराज सिंगने मुलाखत दिली. माझ्यावर बायोपिक बनवायची असेल, तर मीच त्यामध्ये काम करेन, अशी विनोदी प्रतिक्रिया युवराजने सुरुवातीला दिली. नंतर मात्र भूमिकेसाठी कोणाला घ्यायचं हे दिग्दर्शकाचं काम असतं, अस युवराज म्हणाला. सिद्धांत चतुर्वेदी माझ्या रोलसाठी चांगला पर्याय असल्याचं युवराजने सांगितलं.


युवराज सिंगने २०१९ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. नुकत्याच झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये युवराज सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात इंडियन लिजेंड्सकडून खेळला होता. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा स्थगित करावी लागली.