Yuvraj Singh on Virat Kohli Birthday: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली युवकांच्या गळ्याचा ताईत... आज तो 34 वा वाढदिवस (Virat Kohli Birthday) साजरा करतोय. विराट कोहली आणि भारताचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) यांची दोस्ती तर संपुर्ण जगाला माहिती आहे. युवराजच्या अखेरच्या क्रिकेट करियरच्या काळात विराटने युवराजला खूप सपोर्ट केला. अशातच युवराजने लाडक्या चिकूच्या बर्थडेला खास पोस्ट शेअर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅन्सरनंतर युवराजला भारतीय संघात पुन्हा स्थान देऊन सुखद निरोप देण्याची संधी मिळवून दिली. त्यामुळे बाकी काहीही असो युवराज आणि विराटची दोस्ती म्हणजे जय विरूची दोस्ती... मागील काही काळात विराट फॉर्ममध्ये नव्हता. विराट डिप्रेसमध्ये असताना युवराज त्याच्या मदतीला धावून आला. युवराजने आपल्या हृद्याच्या जवळचा गोल्डन बुट (Yuvraj Singh Golden shoes to Virat Kohli ) विराटला पाठवला. त्यामुळे विराट देखील भावूक झाला होता.


आज किंग कोहलीचा बर्थडे... (Virat Kohli's 34th Birthday) विराटच्या चाहत्यांचा खास दिवस...क्रिडाविश्वातून विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच आता युवराजने एक व्हिडीओ शेअर (Yuvraj Singh Share Video) करत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.


आणखी वाचा - युवराज सिंहने विराट कोहलीच्या नावे केली 'ही' Golden गोष्ट! काय म्हणाला युवराज?


कधीही न बोलण्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लिजेंडला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आज तू जो काही आहेस ते तुझ्या कठोर परिश्रम, समर्पण आणि चांगल्या वृत्तीचा परिणाम आहे. अशीच कामगिरी सुरू ठेव आणि वर्ल्ड कप घरी आण, असंही युवराज म्हणाला आहे. त्याचबरोबर, तुझ्यावर भरपूर प्रेम..., असंही युवराज म्हणालाय.


पाहा व्हिडीओ-



दरम्यान, विराटने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या मस्तीचे अनेक फोटो पहायला मिळत आहे.  विराट आणि युवराज (Yuvraj Virat) या दोघांची यारी क्रिकेटमधील नंबर वन यारी आहे, असं म्हणतात. त्याचा प्रत्तय अनेकदा पहायला मिळतो. दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियाला (Team India) वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं काम देखील केलं आहे.