मुंबई : युवराज सिंग टीम इंडियाचा तो खेळाडू आहे ज्याने २००७ चा पहिला टी२० वर्ल्डकप, २०११ चा वनडे वर्ल्डकप आणि २००० मध्ये अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकप जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे. २००७ च्या टी२० वर्ल्डकप आणि २०११ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली होती ज्यामुळे त्याला प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट पुरस्कार देखील मिळाला होता.  त्याने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आता निवृत्तीची घोषणा केली आहे. १९ वर्षांचा त्याचा क्रिकेटचा प्रवास आता थांबला आहे. असं म्हणत युवराज भावूक झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज सिंगने आपल्या चाहत्यांचे, मीडियाचे आणि खेळाडूंचे आभार मानले. निवृत्तीनंतर तो काय करणार आहे याबाबत देखील त्याने यावेळी सांगितले. युवराजने म्हटलं की, अनेक वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आता मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी आता कॅन्सरग्रस्तांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा लोकांची मी मदत करणार आहे.'
 
सिक्सर किंग म्हणून ओळख असलेल्या युवराजने You We Can नावाची संस्था सुरु केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ते देशभरातील कँसर पीडितांसाठी काम करतात. आजारी व्यक्तींची मदत करतील. आर्थिक मदत ही करणार असल्याचं यावेळी त्याने म्हटलं.


युवराजला देखील कॅन्सर झाला होता. २०११ च्या वर्ल्डकपनंतर ही गोष्ट समोर आली आणि संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला. पण युवराजने यातूनही विजय मिळवला आणि २ वर्षाच्या उपचारानंतर पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात केली. यानंतर युवराजने कॅन्सरग्रस्तांसाठी संस्था स्थापन केली.