पोर्ट ऑफ स्पेन : टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वन-डेत विजय साकरला. रहाणेनं 103 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याची वन-डे करिअरमधील ही तिसरी सेंच्युरी ठरली आहे. यासह मॅचमध्ये युवराजबाबत एक मजेदार किस्सा घडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्या आऊट झाल्यानंतर युवराज जेव्हा मैदानावर आला तेव्हा सगळेच हैराण झाले. युवराजची जर्सी पाहून अनेकांना प्रश्न पडला. कारण त्याने या सामन्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची जर्सी घातली होती. मॅनेजमेंट प्रत्येक सिरीजसाठी वेगळी जर्सी खेळाडूंना देते. पण युवराजने ही जर्सी का घातली याचं कारण समोर आलेलं नाही.


आता फिल्डींगसाठी आल्यावर देखील युवराज कोणत्या जर्सीवर दिसतो याबाबत प्रेक्षकांना प्रश्न होता पण यावेळेस मात्र तो जर्सी बदलून आला होता. पण यावरुन युवराज सिंगच्या या चुकीवर सोशल मीडियात मात्र चर्चांना उधाण आलं.