Yuzvendra Chahal News: येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. नुकतंच वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीम इंडियामध्ये स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलला संधी देण्यात आलेली नाही. गेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही युझवेंद्रला संधी देण्यात आली नव्हती. टीममध्ये युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्यात आलीये. अशातच टीममधून डावलल्यानंतर युझवेंद्रने ( Yuzvendra Chahal ) मोठं विधान केलं आहे. 


वर्ल्डकप टीममधून डावलल्यानंतर काय म्हणाला युझी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपसाठी 15 जणांच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये युझवेंद्रच्या ( Yuzvendra Chahal ) नावाचा विचार केला गेला नाही. मात्र यानंतर चहलने एक अशी मागणी केलीये, ज्यामुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. टीम इंडियाची टेस्ट सामना खेळणं हे चहलचं स्वप्न असल्याचं त्याने म्हटलंय. 


एका इंग्लिश बेवसाईटला इंटरव्ह्यू देताना युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) म्हणाला की, आपल्या देशासाठी इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. ज्यावेळी तो क्रिकेटर आपल्या देशासाठी पांढऱ्या जर्सीमध्ये लाल बॉलसोबत खेळतो तेव्हा तो टॉपवर असतो. मला देखील हे करायचं आहे. मी लिमिटेड ओव्हर्सच्या खेळामध्ये खूप कामगिरी केलीये. मात्र आता माझं पुढील टारगेट टेस्ट क्रिकेट खेळणं आहे. मी माझ्या नावापुढे टेस्ट क्रिकेटरचा टॅग पाहू इच्छितो. 


वर्ल्डकपच्या टीममधून युझवेंद्रला डावललं


वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या स्क्वॉडची घोषणा करण्यात आली असून स्पिनर युझवेंद्र चहलला टीममधून वगळण्यात आलं. इतकंच नाही तर युझवेंद्र चहलने या वर्षात फक्त दोन वनडे खेळलेत. युझवेंद्र चहलने ( Yuzvendra Chahal ) भारताकडून 72 वनडे सामन्यात 121 विकेट घेतल्यात. दरम्यान सध्या सुरु असलेल्या एशिया कपमध्येही युझवेंद्रला संधी देण्यात आली नाहीये. 


युझवेंद्र चहलचा मोठा निर्णय


वर्ल्डकपमध्ये संधी न मिळाल्याने आता टीम इंडियाच्या ( Team India ) या क्रिकेटपटूने एक मोठा निर्णय घेतलाय. यानुसार तो दुसऱ्या देशात क्रिकेट खेळण्यासाठी जाणार आहे. चहलने काउंटी चॅम्पियनशिपचे तीन सामने खेळण्यासाठी इंग्लिश काऊंटी टीम केंटशी करार केला आहे. युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) केंटच्या घरच्या मैदानावर नॉटिंगहॅमशायर आणि लँकेशायरविरुद्धच्या सामन्यांसाठी आणि सॉमरसेटविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. 


वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.