मुंबई : सध्या सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्याची जोरदार चर्चा आहे. या दोघांमध्येही काहीतरी बिनसलं असल्याचंही बोललं जातंय. एकेकाळी आपल्या रोमँटिक फोटोंनी लोकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या जोडप्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युजवेंद्र आणि धनश्रीच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर स्टार पत्नीने तिच्या पतीचं आडनाव 'चहल' इन्स्टाग्रामवरून काढून टाकलंय. आता तिने फक्त तिच्या नावाप्रमाणे 'धनश्री वर्मा' असं सोशल मीडियावर लिहिलेलं दिसतंय.


या दोघांमधील नात्याच्या चर्चेला तोंड फुटलं जेव्हा युझवेंद्रने एक इन्स्टा स्टोरी शेअर केल्यानंतर हे सर्व घडलं. त्याने एक फोटो पोस्ट केला होता, ज्यावर लिहिलं होतं, 'न्यू लाईफ लोडींग'.



युझवेंद्र आणि धनश्री यांनी यांच्या या सोशल मीडियावर पोस्ट आणि बदलामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं गेलंय. मात्र अद्याप दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. 


22 डिसेंबर 2020 रोजी, युझवेंद्र आणि धनश्री यांनी त्यांच्या संबंधित इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केल्यावर त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं होतं. दरम्यान चाहते या दोघांमध्ये सर्वकाही ठीक असण्याबाबत प्रार्थना करतायत.