रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी -२० सामना रांचीमध्ये रविवारी खेळवण्यात आला. हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार नऊ विकेट्स राखून जिंकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल १७ धावा करुन बाद झाला. विशेष म्हणजे या सामन्यातही मॅक्सवेलची विकेट युझवेंद्र चहलनेच घेतली. याआधी या मालिकेत तीन वेळा त्याने मॅक्सवेलची विकेट घेतली. 


सातव्या षटकांत मॅक्सवेल बाद झाला. चहलने सातव्या षटकातील तिसऱ्या बॉलवर मॅक्सवेलला बुमराहकडे झेल देण्यास भाग पाडले. मॅक्सवेल बाद झाला आणि चहलला जोरात हसू आले. याआधी वनडे मालिकेत तीन वेळा चहलने मॅक्सवेलची विकेट घेतली होती. 


भारत दौऱ्यात मॅक्सवेल चार सामने खेळला आणि चारही वेळा त्याला चहलने बाद केले. यामुळे टी-२०मध्येही पुन्हा मॅक्सवेलची विकेट मिळवल्यानंतर त्या हसू आवरले नाही. त्याच्या हसण्याबरोबर बाकी क्रिकेटर्सही हसू लागले. 


असा झाला होता सामना


सामन्यात भारताने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाने १८.४ षटके खेळताना ८ बाद ११८ धावा केल्या. यानंतर पाऊस सुरु झाला आणि सामना थांबवावा लागला. 


ऑस्ट्रेलियाकडून आरोन फिंचने सर्वाधिक ४२ धावा केल्या. याशिवाय मॅक्सवेल आणि टिम पॅनेने प्रत्येकी १७ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.


पाऊस थांबल्यानंतर भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार ६ षटकांत ४८ धावांचे आव्हान देण्यात आले. भारताने हे आव्हान ९ विकेट राखत पूर्ण केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.