अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने १ विकेट घेऊन मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. युजवेंद्र चहल आता टी -20 आंतरराष्ट्रीय प्रकारात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चहलने बुमराहचा विक्रम मोडला


युजवेंद्र चहलने जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडत हा पराक्रम केला आहे. युजवेंद्र चहलचे नाव आता टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी सर्वाधिक 60 विकेट बनले आहे. यापूर्वी युजवेंद्र चहलने 59 विकेट्ससह जसप्रीत बुमराहची बरोबरी केली होती. पण आता त्याने बुमराहलाही मागे सोडले आहे.


युजवेंद्र चहलने 46 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 60 विकेट घेतले आहेत. त्याचबरोबर बुमराहने 50 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 59 विकेट्स घेतल्या आहेत. लग्नाच्या तयारीमुळे बुमराह या टी -२० मालिकेचा भाग नाही. युजवेंद्र चहल बद्दल बोललो तर टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 5 विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. टी -20 आंतरराष्ट्रीयमध्ये युजवेंद्र चहलची सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद 25 रन देत 6 विकेट घेण्याची आहे.


टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारे
 
1. युजवेंद्र चहल - 60 विकेट
२. जसप्रीत बुमराह - 59 विकेट
रविचंद्रन अश्विन -  52 विकेट
भुवनेश्वर कुमार - 41 विकेट
कुलदीप यादव / रवींद्र जडेजा - 39  विकेट
हार्दिक पांड्या - 38 विकेट
 
भारतासाठी तीन स्वरूपात सर्वाधिक विकेट नोंदवण्याचा विक्रम
 
1. वनडे - 334 बळी - अनिल कुंबळे
2. टेस्ट- 619 विकेट - अनिल कुंबळे
3. टी-20 - 60 विकेट - युजवेंद्र चहल