Yuzvendra Chahal Viral Video: भारतीय संघ रविवारी 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने या जागतिक स्पर्धेत आपल्या टी-ट्वेंटी मोहिमेची सुरुवात करेल. टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल सोशल मीडियावर सक्रिय असतो. अनेकदा तो मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. तो सध्या ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळत असलेल्या संघासोबत आहे. दरम्यान, चहलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैदानावरील खेळाडूंशी विनोद असो किंवा मैदानाबाहेरची मजा... युझी चहल नेहमीच पुढे दिसतो. त्याचे व्हिडिओही चांगलेच पसंत केले जातात. Chahal TV नावाचा त्याचा खास शो देखील आहे. आता त्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये चहल एका लहान मुलाला त्रास देताना दिसत आहे. आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केलाय.


आणखी वाचा - AUS VS NZ : ग्लेन फिलिप्स बनला 'सुपरमॅन', T20 World Cup च्या इतिहासात असा कॅच पाहिलाच नसेल!


युजवेंद्र चहल त्याच्या खोडकर कृत्यांसाठी ओळखला जातो, एका व्हिडिओमध्ये पहिला लॉलीपॉप दाखवून मुलाला प्रलोभन देताना दिसतोय. त्यानंतर बारक्या लेकराला 'बाबाजी का ठुल्लू' दाखवून हसायला लागतो. लॉलीपॉप तोंडात दाबून तो मुलाला वेगवेगळे हावभाव करत बारक्या मुलाला चिडवताना दिसतोय. सोशल मीडियावर चहलचा हा व्हिडिओ काही चाहते लाइक करत आहेत तर काही त्याची खिल्ली उडवत आहेत. 


पाहा व्हिडीओ - 



दरम्यान, युजवेंद्र चहलच्या खोड्या पाहून अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. टीम इंडियात खेळतो, तरी युझी अजूनही बारकाच आहे, असं एका युझरने म्हटलंय. दरम्यान, आगामी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात युझी चहल कमाल दाखवले, अशी सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे आता आता तरी गेम बाबत सिरीयस हो, असे खडे बोल चहलला सुनावले आहेत.