मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. धनश्री सतत तिचे डान्स व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते जे व्हायरल होतात. धनश्रीने आता इंस्टाग्रामवर नवे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनश्री वर्माने बाथरूम सेल्फी पोस्ट केला आहे, ज्यावर लाखो लाईक्स आले आहेत. धनश्री वर्माच्या या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कमेंटमध्ये सुंदर, क्यूट अशी कमेंट केली आहे. तर एका यूजरने जिओ भाभीजी असे लिहिले आहे.



टीम इंडिया अजूनही इंग्लंड दौऱ्यावर होती, तिथे धनश्री वर्मा युजवेंद्र चहलसोबत पोहोचली होती. धनश्री सतत इंस्टाग्रामवर इंग्लंड दौऱ्याचे फोटो शेअर करत आहे.


धनश्री वर्मा एक कोरिओग्राफर आहे, तिचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होतात. युझवेंद्र चहलने धनश्रीसोबत अनेक डान्स व्हिडिओही बनवले आहेत.



 
धनश्रीने अलीकडेच लेटेस्ट ट्रेंडवर एक डान्स व्हिडिओ बनवला आहे, ज्याला पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. धनश्री वर्माच्या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आणि व्हिडिओ व्हायरल झाले.



 
लॉकडाऊन दरम्यान टीम इंडियाचा स्टार युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केले होते. आयपीएल मॅचेस किंवा टीम इंडिया मॅचेसमध्ये धनश्री सतत स्टँडवर हजर असते आणि पती युजवेंद्र चहलला सपोर्ट करते.