युझी-धनश्रीचं नातं पुन्हा चर्चेत? चहलला नाही तर या व्यक्तीला धनश्री म्हणते `I Love You`
एकदा धनश्रीच्या पोस्टमुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबई : टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा अलीकडे खूप चर्चेत आहेत. धनश्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या नावामधून चहल हे आडनाव काढून टाकलंय. ज्यावर अनेक प्रकारच्या अफवा सुरू झाल्या. अशातच दोघांमध्ये काहीतरी गडबड असल्याचा अंदाज लावला गेला. दरम्यान यानंतर दोघांनीही त्यांच्यात काहीही बिनसलं नसल्याची पुष्टी दिली. मात्र पुन्हा एकदा धनश्रीच्या पोस्टमुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
नुकतंच धनश्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती विशालसोबत 'माही वे' गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यासोबतच त्याने बर्थडे विशसोबत आय लव्ह यू असंही म्हटलं आहे. दरम्यान लव्ह यू म्हटल्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विशाल नेमका कोण आहे हे अनेकांना माहिती नाही. मात्र हा दुसरा कोणी नसून धनश्रीचा भाऊ आहे. विशाल वर्मा मॅक्स स्टील फिटनेस सेंटर चालवतो. तो पर्सनल फिटनेस ट्रेनर देखील आहे. धनश्रीने शेअर केलेलं गाणे गेल्या वर्षीच्या रक्षाबंधनाचं आहे. 24 ऑगस्टला विशालचा वाढदिवस असतो. त्याला शुभेच्छा देण्यासाठी तिने ही पोस्ट शेअर केली होती.
दरम्यान नुकतंच धनश्री-युझी या कपलचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. या जोडप्याने एक मजेशीर रिल शेअर केलं. इन्स्टाग्रामवर हे रिल क्षणार्धात व्हायरल झाले असून त्यांना पुन्हा एकदा अशाप्रकारे व्हिडिओ बनवताना पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यांच्यात काही बिनसलेलं नाही, हेच यातून स्पष्ट होतंय.