अनवाणी `बुल रन`, आकाश बामणे खरा हिरो । पाहा मॅरेथॉन निकाल
झी बिझनेस` बीएसई बुल रनमध्ये राज्यातल्या महिला धावपटूंचे वर्चस्व राहिले.
मुंबई : झी बिझनेस' बीएसई बुल रनमध्ये ( BSE Bull Run) मुंबईतील आकाश गोपाळ बामणे ( मूळचा बेळगाव) याने अनवाणी धावत पुरुष गटात दुसरा क्रमांक पटकावला. दरम्यान, झी बिझनेस बीएसई बुल रनमध्ये महिला गटात राज्यातल्या महिला धावपटूंचे वर्चस्व राहिले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या साक्षी सुभाष पवार हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर भांडूपच्या राजश्री साळुंखेने दुसरा तर ठाण्याच्या गीता राठोडने तिसरा क्रमांक पटकावला. तर पुरूष गटात पहिला क्रमांत गुरूजंतसिंगने तर दुसरा क्रमांक पटकावला राज्यातल्या आकाश गोपाळ बामणे याने.
तसेच झी बिझनेस बीएसई मॅरेथॉनमध्ये ५३ वर्षीय विठ्ठल कांबळे यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे कांबळे यांची ही १६० वी मॅरेथॉन होती. फिटनेसचं महत्त्व जाणणाऱ्या कांबळे यांना विविध मॅरेथॉन स्पर्धात धावायची आवड आहे. तरूणांनी धावावं आणि आरोग्य उत्तम राखावं असा संदेश त्यांनी दिला.
बुल रन महिला विजेत्या
पहिली - साक्षी पवार
दुसरी - राजश्री साळुंखे
तिसरी - गीता राठोड
बुल रन पुरुष विजेते
पहिला - गुरुजंतसिंग
दुसरा - आकाश गोपाळ बामणे
तिरसा - साहेब सिंग
सेलिब्रिटी
- विकास खन्ना, शेफ
- सनी सिंग, अभिनेता
- सोनाली सैगल, अभिनेत्री
दरम्यान, ५३ वर्षीय धावपटू विठ्ठल कांबळे यांचा उत्साह दांगडा असल्याचे दिसून आले. त्यांची ही १६० वी मॅरेथॉन होती.
रविवारची सकाळ मुंबईकरांसाठी विशेष ठरली
झी बिझनेस बीएसई मॅरेथॉनमध्ये २२ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या बीएसई मॅरेथॉनमध्ये मोठा उत्साह दिसून आला. सकाळी ६ वाजता ही स्पर्धा सुरु होणार होती. मात्र, पहाटे ४ वाजल्यापासून बीकेसीत अनेकांनी हजेरी लावली होती. झी बिझनेस या अर्थविश्वातल्या आघाडीच्या वृत्तवाहिनी आणि मुंबई स्टॉक इक्स्चेंजतर्फे मुंबईत बांद्रा कुर्ला काँम्प्लेक्स इथे बुल रनचे आयोजन केले होते.
बीकेसीच्या ग्राऊंड नंबर १ इथून या रनला सुरूवात झाली. सहा किलोमीटरची ही रन असणार आहे. या रनसाठी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत २० हजारांहून अधिक मुंबईकर सहभागी झाले होते. राजकारण, अर्थ, उद्योगजगत, फिल्म, शेअर मार्केट या क्षेत्रातले दिग्गजही उपस्थित होते. सहा किलोमीटरच्या रनमध्ये पुरूषांमध्ये गुरूजंत सिंग तर महिलांमध्ये साक्षी पवार यांनी विजेतेपद पटकावलं. या रन आधी दिमाखदार रंगारंग कार्यक्रम झाला.