मुंबई : जवळपास 13 लाख भारतीयांचा डेबिट आणि क्रेडिट कार्डचा डेटा चोरीला गेला आहे. यामध्ये भारतीयांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची सर्वमाहिती  'डार्क वेब'च्या अंतर्गत सगळ्यांसाठी खुली झाली आहे. या वर्षभरातील ही सर्वात मोठी सायबर चोरी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झेडडीनेट (ZDNet) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कार्डची माहिती ही जोकर स्टॅश (Joker Stash) वर उपलब्ध आहे. जोकर स्टॅश हे डार्क वेबवरील सर्वात जुन्या कार्ड शॉपपैकी एक मुख्य जागा आहे. जी हॅकर्सची कार्ड डंप विकणारी जागा म्हणून ओळखली जाते.


सिंगापुरच्या आयबीए (IBA)सुरक्षा टीमने यासर्वाची माहिती मिळवली आहे. 'INDIA-MIX-NEW-01'या हेडिंच्या अंतर्गत जोकर स्टॅशने भारतीयांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची सगळी माहिती उपलब्ध करून ठेवली आहे. ही माहिती दोन खंडात म्हणजे ट्रॅक-1 आणि ट्रॅक -2 मध्ये  उपलब्ध केली आहे. 


प्राथमिक माहितीनुसार ट्रॅक-2 ची चोरी झाली असून यामध्ये कार्डच्या मागे असलेल्या मॅग्नेटिक स्ट्रिपमधील माहिती आहे. यामध्ये ग्राहकाचं प्रोफाइल म्हणजे सर्व प्राथमिक माहिती आणि व्यवहारांची माहिती आहे. ट्रॅक 1 मध्ये फक्त कार्ड नंबरची माहिती असते, जी अगदी सामान्य आहे. यामध्ये 98 टक्के भारतीय बँकांच्या कार्डचा समावेश आहे तर 2 टक्के हा कोलिंबियातील बँकाच्या कार्डचा समावेश आहे. 


ग्रुप आयबीएने शेअर केलेल्या स्क्रीन-शॉटनुसार प्रत्येक कार्ड 100 डॉलर म्हणजे 7,092 रुपयांत विकलं जात आहे. 13 लाख कार्डची एकूण किंमत 130 मिलियन डॉलर म्हणजे 921.99 करोड रुपये आहे. सर्वात अगोदर झेडडीनेट (ZDNet) याबाबत रिपोर्ट केलं होतं. 28 ऑक्टोबरला याबाबत माहिती मिळाली.