मंबई : टू व्हिलर निर्माता कंपनी केटीएमनं भारतीय बाजारात आपली आणखीन एक नवी बाईक लॉन्च केलीय. यावेळी कंपनीनं '२०० ड्युक एबीएस' लॉन्च केलीय. यापूर्वी, कपंनीनं अॅडव्हेंचर बाईक 'केटीएम ३९०' भारतीय बाजारात लॉन्च करण्याची इच्छा दर्शवलीय. ही बाईक २०१८ मध्ये भारतात दाखल होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०० ड्युक परंतु, एबीएसशिवाय असलेल्या वर्जनची दिल्ली एक्स शोरुम किंमत १,५१,७५७ रुपये आहे. 


२०० ड्युक एबीएससहीत बाईकमध्ये २५ पीएस पॉवर आहे. तसंच ट्रेलिस फ्रेम, अॅल्युमिनिअम स्विंगआर्म आणि उलट सस्पेन्शन यांसहीत रेसिंग उपकरणांसहीत ही बाईक दमदार अनुभव देते. बॉशद्वारे सादर करण्यात आलेल्या २०० ड्युक एबीएस अधिक नियंत्रणासोबत थांबण्याची ताकद बाईकला देते. 


२०० ड्युक एबीएस ही बाईक नारंगी, सफेद आणि काळ्या अशा तीन रंगांत उपलब्ध असेल. बाईकची दिल्लीत एक्स शोरुम किंमत १.६० लाख रुपये आहे.