मुंबई : चारचाकी गाड्यांमध्ये कार विश्वातील महत्त्वाचे नाव म्हणजे रोल्स रॉयस. या कंपनीने नुकतीच आपली नवी कोरी कार लॉन्च केली. फॅंटम असे या कारचे नव असून, या कारची भारतातील किंमत ही ९.५ कोटी ते ११.३५ कोटी रूपयांपर्यंत आहे. ही किंमत गाडीच्या फिचर्सनुसार बदलताना दिसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी कोरी फॅंटम ही चारी कोपऱ्यांना एअर सस्पेंशनयुक्त असी आहे. यात १३० किलोचे साऊंड इन्सूलेशन, डबल लॅमिनेटेड ग्लास आणि ड्यूअल स्किल अलॉयज आहे. कंपनीने माहिती देताना म्हटले आहे की, 'जेव्हा रोल्स रॉयस्चाय इंजिनियर्सनी रोड आणि व्हायब्रेशन टेस्ट केले तेव्हा, साऊंड लेवल अत्यल्प असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. आपण वापरलेले फिचर्स योग्य पद्धतीने काम करताहेत की, नाही यासाठी त्यांनी ही चाचणी केली', असेही कंपनीने म्हटले आहे. 


गाडीच्या इंजिनाबाबत म्हणाल तर, ६.७५ लीटरवाले ट्विन टर्बो चार्ज्ड व्ही१२ इंजिन ५६३ बीएचपीची पॉवर आणि ९०० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करण्याची क्षमता हे वैशिष्ट्य. विशेष असे की, ८ स्पीड, सॅटेलाईट-एडेड ट्रान्समिशनच्या सहाय्याने या कारला ० ते १०० किलोमीटर प्रतितास वेग धारण करण्यासाठी केवळ ५.४ सेकंद इतका वेळ लागतो.