नवी दिल्ली : दिवाळीनिमित्त विविध कार कंपन्यांनी वेगवेगळ्या ऑफर आणल्या आहेत. तुम्ही जर या दिवाळीत कार खरेदी करण्याच्या प्लॅन करत असाल तर तुम्हाला आनंद देणारी एक ऑफर समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोनवर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक स्कीम सध्या धमाका उडवत आहे. काही कार कंपन्यांनी त्यांच्या कार्सवर ५ हजार रूपयांपेक्षा कमी EMI मध्ये कार खरेदी करण्याची ऑफर आणली आहे. या कार तुम्ही केवळ १ लाख रूपयांच्या डाऊन पेमेंटवर करू शकता. 


रेनो क्विड -



रेनो क्विड(Renault Kwid)  या कारची दिल्ली एक्स शोरूम किंमत २.६२ लाख रूपये इतकी आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही ८० हजार रूपयांचे डाऊन पेमेंट करून करू शकता. शिल्लक रक्कम तुम्ही EMI ने देऊ शकता. जर तुम्ही ७ वर्षांसाठी EMI कराल तर तुम्हाला महिन्याला केवळ २,९९९ रूपयांचा EMI भरावा लागेल. 


मारूती अल्टो ८०० -



मारूती अल्टो ८०० च्या बेसिक व्हेरिएंटची किंमत २.४६ लाख रूपये इतकी आहे. तर या कारच्या VXI व्हेरिएंटची किंमत ३.२५ लाख रूपये इतकी आहे. ही कार तुम्ही १ लाखांचं डाऊन पेमेंट करून घेऊ शकता. जर तुम्ही १ लाख रूपये डाऊन पेमेंट कराल आणि ५ वर्षांसाठी EMI चा कालावधी ठेवाल तर तुम्हाला ४,७१९ रूपयांची EMI महिन्याला द्यावी लागेल. 


ह्युंदाई ईऑन -



दिल्लीमध्ये ह्युंदाई इऑनची एक्स शोरूम किंमत ३.२९ लाख रूपये होती. कार घेताना तुम्ही जर १ लाख रूपयांचं डाऊन पेमेंट कराल तर महिन्याला तुम्हाला ४, ६७७ रूपयांची EMI भरावी लागेल. 


टाटा टियागो -



या कारची दिल्ली एक्स शोरूम किंमत ३.२४ लाख रूपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला १ लाखांचे डाऊन पेमेंट करावे लागेल. इतके डाऊन पेमेंट केल्यास तुम्हाला ४,६७७ रूपयांची EMI  भरावी लागेल. एसबीआयने या कारवर ९.२५ टक्के लोन ऑफरही दिली आहे. 


डॅटसन रेडि-गो-



ही कार सध्या एक चांगला पर्याय आहे. ही कार खरेदी करण्यासाठी १ लाख रूपयांचे डाऊन पेमेंट करावे लागेल. २.४१ लाख रूपये किंमतीच्या या कारसाठी तुम्हाला ३,१४१ रूपयांची महिन्याला EMI भरावी लागेल. ही EMI तुम्हाला ६० महिने भरावी लागेल.