Lenovo K8 Note भारतात झाला लाँच
स्मार्टफोन बनवणारी चीनी कपंनी लेनोवोने आपला नवा स्मार्टफोन Lenovo K8 Note भारतात लाँच केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे २ मॉडेल लाँच केले आहेत.
मुंबई : स्मार्टफोन बनवणारी चीनी कपंनी लेनोवोने आपला नवा स्मार्टफोन Lenovo K8 Note भारतात लाँच केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे २ मॉडेल लाँच केले आहेत.
या स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉनवर एक्सक्लुझिव सेलमध्ये हा फोन उपलब्ध आहे. हा सेल अॅमेझॉनवर १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. लेनोवो K8 Note दोन कलर वेरिएंटमध्ये लाँच केलं आहे. यासोबत अनेक ऑफर्स देखील मिळणार आहेत. याला खरेदी करण्यासाठी किंडल ईबुकवर ८० टक्केपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. यावर सर्वाधिक म्हणजे ३०० रुपये डिस्काऊंट मिळणार आहे.
यासोबतच आयडीया युझर्सला ६४ जीबी डेटा ऑफर देण्यात आला आहे. जर आयडिया युझर्स ३४३ रुपयाचे रिचार्ज केला तर त्यांना या ऑफरचा फायदा होणार आहे. याची वॅलिडीटी ५६ दिवसांची असणार आहे. या फोनचा फाइन गोल्ड आणि वॅनम ब्लॅक कलरमध्ये लाँच केले आहेत. कंपनीने याचा एक मॉडेल ३जीबी रॅमसोबतच दुसरा ४जीबी रॅमसोबतच लाँच केलं आहे. याच्या ३ जीबी रॅमवाल्या मॉडेलची किंमत १२,९९९ रुपये असून ४ जीबी रॅमवाले मॉडेलची किंमत १३,९९९ रुपये इतकी आहे.
याच्या फिचर्सबद्दल आता बोलूया.....
यामध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये डेका कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ३ जीबी आणि ४ जीबी रॅमचे दोन विकल्प देखील देण्यात आले आहेत.
याच्या ३ जीबी रॅम मॉडेलमध्ये ३२ जीबीचे इंटरनल मेमरी आहे. तर ४ जीबी रॅम मॉडेलमध्ये ६४जीबी मेमरी आहे. आणि महत्वाचं म्हणजे या दोन्ही फोनची इंटरनल मेमरी मायक्रोएसडी कार्डने १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो.
फोनच्या बॅक पॅनलवर फिंगर प्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोनच्या कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं तर यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा देखील आहे. याच्या रिअरमध्ये एक कॅमेरा १३ मेगापिक्सल तर दुसरा ५ मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये एलडी फ्लॅशसोबत १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
तसेच या स्मार्टफोनमध्ये शानदार साऊंडसाठी स्मार्टफोनमध्ये डॉल्बी एट्म्स देण्यात आले आहेत.
हा फोन गुगलच्या लेटेस्ट एंड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम नूगा ७.११ वर काम करत आहे. हा एक ड्युअल सिम फोन आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, बॅटरी २४.७ तास टॉक टाइम आणि ३७८ तास स्टँडबाय टाइम देणार आहे.