Whatsapp : व्हॉट्सअॅप यूझर्सासाठी धक्कादायक बातमी, तब्बल 50 कोटी यूझर्सचे मोबाईल नंबर...
व्हॉट्सअॅप (Whtsapp) यूझर्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
मुंबई : व्हॉट्सअॅपचा (Whatsapp) मोठया प्रमाणात वापर केला जातो. कंपनीकडून यूझर्सना सातत्याने एकसेएक भन्नाट फीचर्स (Whtsapp Features) दिले जातायेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र यादरम्यान व्हॉट्सअॅप यूझर्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सायबरन्यूजच्या (Cybernews) रिपोर्टनुसार, जवळपास 50 कोटी व्हॉट्सअॅप यूझर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती आहे. या 50 कोटी व्हॉट्सअॅप यूझर्सचा मोबाईल नंबर हॅकिंग फॉरमवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे लीक झालेल्या डेटात एकूण 84 देशांमधील यूझर्सचे मोबाईल नंबर आहेत. (50 crore Whatsapp users data leak hackers be sales this number know how to check your data leak or not)
50 कोटी यूझर्सपैकी 3 कोटी 20 लाख इतका डेटा अमेरिकेतील यूझर्सचा आहे. तर इजिप्तमधील 4 कोटी 50 लाख, इटलीतील 3 कोटी 50 लाख, सौदी अरेबियातील 2 कोटी 90 लाख, फ्रांस आणि तुर्कीतील प्रत्येकी 2 कोटी यूझर्सचा डेटा असल्याचा दावा सेल करण्यासाठी डेटा टाकणाऱ्यांचा आहे.
डेटामध्ये रशियातील 1 कोटी आणि यूकेतील 1 कोटी 10 लाख नंबरचा समावेश आहे. आम्ही यूकेतील डेटा 7 हजार डॉलर, यूकेतील डेटा 2 हजार 500 डॉलर आणि जर्मनीतील डेटा 2 हजार डॉलरला विकत असल्याची माहिती विक्री करणाऱ्या व्यक्तीने सायबरन्यूजला दिली.
अनोळखी नंबरवरुन कॉल आल्यास सावधान
हॅकर्स यूझर्सची वैयक्तिक माहिती, बँकिग डिटेल्स आणि इतर गोपनिय माहिती मिळवण्यासाठी या टेक्निकचा वापर करतात. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास मेल आणि अनोळखी लिंक पाठवून फिशींगचा प्रयत्न केला जातो. या अशा मेलवर किंवा लिंकवर क्लिक केल्यास डेटा लिक होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे व्हॉट्सअॅप यूझर्सना अनोळखी क्रमांकावर कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
"आम्ही डेटा सेलरला विनंती केली. त्यानंतर सेलरने पुरावा म्हणून 817 यूएस स्थित क्रमांकाचा एक सँपल शेअर केलं. यानंतर चौकशी करण्यात आली. त्यानंतर समजलं की त्याद्वारे व्हॉट्सअॅप चालवलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ते नंबरही एक्टिव्ह आहेत", असं सायबरन्यूजने म्हटलं.
डेटा लीक झाल्याचं कसं तपासायचं?
- cybernews.com / personal data leak check/ या लिंकवर क्लिक करा.
- मोबाईल नंबर किंवा मेल आयडी टाका.
- त्यानंतर कृपया तपासा 'Check Now' वर क्लिक करा.
- शेवटी तुमचा डेटा लिक झालाय की नाही, हे तुम्हाला समजेल.