4G to 5G Sim Card: भारतात इंटरनेट क्षेत्रात क्रांती झाली आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज 5G सेवेचं (5G Launched in India) उद्घाटन करण्यात आलं. 5G मुळे कोणत्याही अडथळ्याविना व्हिडिओ डाऊनलोड (Dowload Video) करता येणार आहेत. 10 पट वेगाने नेटवर्क वापरता येणार आहे. 5G च्या स्पीडमुळे व्हिडिओ कॉलचा स्पीड अधिक चांगला होणार आहे. व्हिडिओ कोणत्याही व्यत्ययाशिवाय, कोणत्याही बफरिंग शिवाय बघता येणार आहे. तर अवघ्या सेकंदाभरात 1 ते 2 जीबीचा एखादा व्हिडिओ डाऊनलोड होऊ शकतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4G कार्ड होणार बेकार?
मात्र सामान्य नागरिकांच्या मनात  5G च्या वापरासंदर्भात काही प्रश्न आहेत. 5G सिम मार्केटमध्ये आल्यानंतर 4G सिम निरुपयोगी ठरणार का? 4G सिम 5G मध्ये बदलता येणार का? असे प्रश्न काही लोकांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांची आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. 5G सर्व्हिसची सेवा घेण्यासाठी कोणतंही नवीन सिम घ्यावं लागणार नाही. 4G सिममध्येच तुम्हीच 5G सेवेचा वापर करु शकता. त्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये 4G सेटिंग ऑन करावी लागणार आहे. रिचार्जही 5G पॅकनुसारचं करावं लागणारआहे. ही सेवा एअरटेल ग्राहकांसाठी (Airtel Users) आहे. पण Jio यूसर्ससाठी 5G वापरण्यासाठी आपलं जूनं सिम बदलावलं लागू शकतं. 


5G वापरासाठी मोबाईल बदलावा लागणार?
5G सेवेसाठी मोबाईल बदलावा लागणार का? असेही प्रश्न काही लोकांना पडले आहेत. पण सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक फोनमध्ये 5G सेवा कार्यक्षम आहे. काही कंपन्यांनी आपल्या फोनची किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी 5G चा ऑप्शन दिलेला नाही. त्यामुळे 5G वापरण्यापूर्वी तुम्हाला तुमचा फोन तपासावा लागणार आहे. 


कोणत्या शहरात 5G सेवा मिळेल?
दिवाळीपर्यंत देशातील 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर विस्तारलं जाईल.  पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.