६ आकडी नंबर तुमचा नवा पत्ता, सरकार आणतंय दुसरं आधार
आता ६ आकडी क्रमांक तुमचा नवा पत्ता असेल. सरकार तुमच्या घराचा एक डिजिटल अॅड्रेस तयार करणार आहे.
नवी दिल्ली : आता ६ आकडी क्रमांक तुमचा नवा पत्ता असेल. सरकार तुमच्या घराचा एक डिजिटल अॅड्रेस तयार करणार आहे. यासाठी सरकार दुसरं आधार आणण्याच्या तयारीत आहे.
या डिजिटल अॅड्रेसच्या माध्यमातून कुणीही सहज तुमच्या घराचा पत्ता लोकेट करू शकणार आहे. मॅप इंडिया ही कंपनी दूरसंचार मंत्रालयासोबत मिळून एका पायलट प्रोजेक्टवर काम करत आहे. या सुविधेमुळे पोस्टाच्या पोस्ट मास्तरलाही तुमच्या घराचा पत्ता शोधण्यास मदत होईल. भास्कर डॉट कॉमने याबाबतचे वृत्त दिलं आहे.
अॅड्रेसचं आधार-
मोदी सरकारच्या प्लॅननुसार सरकार प्रत्येक व्यक्तीच्या पोस्टल अॅड्रेसला पर्याय म्हणून एक ६ आकड्यांचा कोड अलॉट करतील. या कोडचं नाव ई-लॉक असेल. या ई-लॉकची खरी ताकद ही आहे की, जेव्हा एखादा व्यक्ती, उद्योगपती किंवा अधिकारी ई-लॉक एन्टर करून सर्च करेल, तर त्याला त्या जागेचं मॅप लोकेशन दिसेल. यासाठी मॅप इंडियाने मॅपमायइंडिया ई-लॉक जारी केलं आहे.
पर्यटक आणि प्रवाशांना मिळणार मदत
मॅपमायइंडियाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार ई-लॉकमुळे भारतीय पर्यटकांनी आणि प्रवाशांना आपलं डेस्टिनेशन सर्च करणे, नॅव्हिगेट करणे आणि शेअर करण्यात मदत मिळेल. याने ई-कॉमर्स, ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टीक आणि फिल्ड ऑपरेशनमध्ये काम करणा-या कंपन्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. या कंपन्या कमीत कमी वेळात डेस्टीनेशनला पोहचवतील.
शहरं आणि गावं शोधणं सोपं
आता शहरं आणि गावांचाही ६ आकडी कोड असेल. अशात कुणालाही ई-लॉक अॅपच्या माध्यमातून शहर, गाव किंवा कोणतीही बिल्डींग शोधणं आणि तिथपर्यंत पोहचवणं सोपं जाणार आहे. ई-लॉक केवळ तुम्हाला डेस्टीनेशनचा मॅपच दाखवणार नाहीतर लोकेशनचे फोटोही दाखवेल.