यूट्यूबवरून हा सहा वर्षांचा मुलगा करतो करोडोंची कमाई
फोर्ब्सनं नुकत्याच जाहीर केलेल्या एका यादीत सोशल वेबसाईट यूट्यूबद्वारे सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या युझर्सची माहिती देण्यात आलीय. यामध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.
मुंबई : फोर्ब्सनं नुकत्याच जाहीर केलेल्या एका यादीत सोशल वेबसाईट यूट्यूबद्वारे सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या युझर्सची माहिती देण्यात आलीय. यामध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.
सहा वर्षांचा रायन नावाचा एक मुलगा खेळण्यांविषयी रिव्ह्यू देतो... त्याचा हा रिव्ह्यू त्याचे पालक यूट्यूब व्हिडिओजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवतात.
फोर्ब्सद्वारे जाहीर केलेल्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या यूट्यूब अकाऊंटमध्ये सहा वर्षांच्या रायनची कमाई तब्बल ११ मिलियन डॉलर असल्याचं जाहीर करण्यात आलंय.
Ryans Toys Review नावानं यूट्यूबवर या चिमुरड्याचं अकाऊंट आहे. या अकाऊंटचे जवळपास १० लाखांहून अधिक यूट्यूब फॉलोअर्स आहेत. १६ मार्च २०१५ रोजी हे यूट्यूब चॅनल सुरु करण्यात आलं होतं. म्हणजेच जवळपास दोन वर्षांत या चॅनलनं १० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स मिळवलेत, हे विशेष...