Smart Ring Price : डिजीटल युगात आता काही अशक्य आहे, असं म्हणताही येत नाही. इंटरनेटच्या क्रांतीने अनेक बदल होताना दिसत आहे. दैनंदिन व्यव्हारात देखील सुलभता येत आहे. तुम्ही अनेक प्रकारच्या अंगठ्या पाहिल्या असतील. काही काळापूर्वी स्मार्ट रिंगही बाजारात आल्या होत्या. मात्र, त्या परिणामकारक असल्याचं दिसलं नव्हतं. बॅटरी नसलेली स्मार्ट अंगठी तुम्ही क्वचितच पाहिली असेल. एका स्टार्टअपने कॉन्टॅक्टलेस पेमेंट रिंग लाँच केली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही अंगठी भारतीय ब्रँड 7 ने NPCI च्या सहकार्याने विकसित केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा दुकानात गेल्यावर टॅप अँड पे असा पर्याय असतोच.  क्रेडिट कार्ड, सॅमसंग पे आणि ऍपल पेसह अनेक सुविधा उपलब्ध असतात. कंपनीने सप्टेंबरमध्ये फिनटेक फेस्ट 2023 मध्ये ही आधुनिक अंगठी प्रदर्शित केली होती. त्यानंतर या अंगठीची मार्केटमध्ये चर्चा होती. आता ही अंगठी तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करत आहे. 


किंमत किती?


कंपनीने ही स्मार्ट अंगठी भारतात 7 हजार रुपये किमतीत लॉन्च केली. तर अर्ली बर्ड ऑफर अंतर्गत, कंपनी ही अंगठी 4,777 रुपयांना विकत आहे. मात्र, ही ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहे. तुम्ही या अंगठीला ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. तुम्ही 829 रुपयांच्या 6 महिन्यांच्या EMI वर 7 अंगठी खरेदी करू शकता. कंपनी या अंगठीला 55 महिन्यांची वैधता आणि 2 वर्षाची वॉरंटी देत आहे. 


दरम्यान, अंगठी सध्या सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. ज्या वापरकर्त्यांकडे आमंत्रण कोड आहे तेच ही अंगठी खरेदी करू शकतात. स्टायलिश डिझाइनसह ही अंगठी उपलब्ध असेल. एरोस्पेस ग्रेड मटेरियल झिरकोनिया सिरॅमिक (ZrO2) पासून बनवण्यात आलीये. या अंगठीसह तुम्हाला IP68 प्रमाणपत्र देखील मिळेल. 100 टक्के वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्याचा दावा देखील कंपनीने केला आहे. केवायसी केल्यानंतर तुम्हाला 2 लाखापर्यंत व्यव्हार करू शकता. यूपीआयशी कनेक्ट केल्यानंतर तुम्ही ही रिंग वापरू शकता.