नवी दिल्ली : वनप्लसने नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 5T गुरूवारी न्यूयॉर्कमध्ये लॉन्च केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनची चर्चा रंगली होती. चला जाणून घेऊ कसा आहे हा फोन आणि किती आहे या फोनची किंमत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

OnePlus 5T मध्ये ६.०१ इंचाचा फुल एचडी ऑप्टिक अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला गेलाय. याचं रिझोल्यूशन 1080x1920 इतकं आहे. स्क्रीनवर २.५ डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चं प्रोटेक्शन देण्यात आलय. हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये आहे. त्यात ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी, तसेच ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज यांचा समावेश आहे. 


या फोनमध्ये दोन कॅमेराचं सेटअप देण्यात आलंय. जे वनप्लस ५ पेक्षा वेगळं आहे. प्रायमरी सेंसर सुद्धा वनप्लस ५ सारखाच १६ मेगापिक्सलचा आहे. सेकंडरी कॅमेरा २० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स ३७६के सेंसर दिलाय. ज्याचं अपार्चर सुद्धा एफ-१.७ आहे. रिअर कॅमेरा सेटअप्सोबत ड्य़ूअल एलईडी फ्लॅश दिला गेलाय. तर OnePlus 5T हा फोन अ‍ॅन्ड्रॉईड ७.१.१ नॉगटवर आधारित ऑक्सीजन ओएसवर काम करतो. या फोनमध्ये फेस अनलॉक फिचरही देण्यात आलंय. 


या फोनमध्ये वनप्लस ५ सारखाच वनप्लस ५टी सुद्धा ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर वापरण्यात आलाय. या फोनचे दोन व्हेरिएंट फक्त मिडनाईट ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध होतील. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत ३२ हजार ९९९ रूपये आहे. तर ८ जीबी रॅम मॉडेलची किंमत ३७ हजार ९९९ रूपये इतकी आहे. भारतात हा स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होईल. स्मार्टफोनचा पहिला सेल २१ नोव्हेंबरला अ‍ॅमेझॉन प्राईम मेंबरसाठी असेल. तर या फोनचा ओपन सेल २८ नोव्हेंबरपासून सुरू होईल.