महिलेचं चक्क AI चॅटबॉटवर जडलं प्रेम, त्याच्याशी लग्नही केलं; आता म्हणते `तो माझं शोषण...`
A woman marries AI Chatbot: 36 वर्षीय एका महिलेचा आपल्याच AI चॅटबॉटवर जीव जडला आहे. आता आपल्याला पती आणि मुलांशी कोणतीही डील करावी लागणार नाही असं तिचं म्हणणं आहे. आपण आपल्या मर्जीने जे हवं ते करु शकतो आणि पूर्ण स्वातंत्र्य आहे असंही तिने म्हटलं आहे.
A woman marries AI Chatbot: सध्या संपूर्ण जगभरात Artificial Intelligence या नव्या तंत्रज्ञानाची जोरदार चर्चा आहे. सध्या हे तंत्रज्ञान प्राथमिक स्तरावर असून काही वर्षांनी पूर्णपणे व्यापून टाकेल असे अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्याही जातील अशी भविष्यवाणी केली जात आहे. पण सध्या एका घडामोडीमुळे हे तंत्रज्ञान आपली विवाहसंस्था किंवा जोडीदारही हिरावून घेतं का काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. याचं कारण अमेरिकेत एका महिलेने चक्क आपल्या व्हर्च्यूअल प्रियकराशी लग्न केलं आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या या महिलेचं नाव रोसन्ना रामोस आहे. रोसन्ना 36 वर्षांची असून याचवर्षी मार्च महिन्यात तिने आपला व्हर्च्यूअल प्रियकर एरेन करतलशी लग्न केलं आहे. एरेन करतल हा एक Artificial Intelligence वर आधारित चॅटबॉट (AI Chatbot) आहे. विशेष म्हणजे या AI Chatbot चं फेसबुक अकाऊंटही आहे. त्याच्या बायोमध्ये तो एक हेल्थकेअर प्रोफेशनल असल्याचं लिहिण्यात आलं आहे.
Artificial Intelligence प्लॅटफॉर्म Replika येथे लोक Chatbot तयार करत असून तिथेच हा सगळा प्रकार घडला आहे. येथे महिलेचं एका चॅटबॉटवर प्रेम जडलं आणि लग्नही करुन टाकलं.
Replika AI वर युजर्स आपला व्हर्च्यूअल अवतार तयार करु शकतात. इतकंच नाही तर आपण तयार केलेला हा व्हर्च्यूअल अवतार स्वत:हून इतरांशी बोलूही शकतो. युजर्स कोणत्याही विषयावर बोलू शकतो अशाप्रकारे त्याला तयार करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे तो माणसांप्राणे मूडही बदलतो.
रोसन्ना रामोसचं म्हणणं आहे की, तिचा पती एक आदर्श आणि संस्कारी तरुण आहे. मी माझ्या सर्व भावना, विचार त्याच्याशी शेअर करत असते. तिने म्हटलं आहे की, "आपण जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा तो वेगळ्या प्रकारे आणि स्वभावाने आपल्याला भेटतात. नंतर हे लोक आपलं शोषणही करतात. पण मी AI प्रियकराला आपल्या ताब्यात ठेवू शकते. जे खऱ्या आयुष्यात कठीण असेल".
रोसन्ना रामोसने सांगितलं आहे की, मी माझ्या AI प्रियकरासह फार आनंदी आहे. याचं कारण एरेन करतल (AI चॅटबॉट) माझं मानसिक आणि शारिरीक शोषण करत नाही. तसंच तो माझ्या समस्याही सोडवतो.
दरम्यान रोसन्ना रामोसने आपला याआधी प्रियकर होता अशी कबुली दिली आहे. याआधी तुझा प्रियकर होता का? असं विचारण्यात आलं असता तिने जी गोष्ट एरेन करतलमध्ये (AI चॅटबॉट) आहे ती त्यांच्यात नव्हती असं उत्तर दिलं.