नवी दिल्ली : तरूणाई आता ऎकमेकांसोबत गप्पा करून वेळ घालवण्यापेक्षा स्मार्टफोनवर जास्त वेळ काढण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. नुकत्याच एका शोधात हा खुलासा करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रिपोर्टमध्ये अ‍ॅडल्ट स्मार्टफोन यूजर्सच्या बिहेविअरची माहिती समोर आली आहे. comScore या रिसर्च कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेत मोबाईल अ‍ॅपचा एक रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणा-या टॉप टेन अ‍ॅप्सची माहिती दिली आहे. 


या रिपोर्टनुसार १८ ते ३४ वयोगटातील लोक एका आठवड्यात २० तास १० स्मार्टफोन अ‍ॅप्स यूज करण्यात वाया घालवतात. सर्वात जास्त अमेझॉन अ‍ॅप यूज केलं जातं. रिपोर्टनुसार ३५ टक्के लोक या अ‍ॅपचा वापर करतात. 


या यादीत दुस-या क्रमांकावर जीमेल आहे. साधारण ३० टक्के लोक जीमेलचा सर्वात जास्त वापर करतात. तर तिस-या क्रमांकावर सोशल नेटवर्कींग साईट फेसबुक आहे. फेसबुक यूज करणा-यांची संख्या २९ टक्के आहे. 


तसेच या शोधात दावा करण्यात आला आहे की, ११ टक्के लोक इन्स्टाग्राम वापरतात. तर आयफोनवर ११ टक्के लोक गूगल मॅपचा वापर करतात. तर १६ टक्के लोक यूट्यूबचा वापर करतात.