Affordable Phone For Kids Safety on Amazon: आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे , अगदी मोबाईच व्यसन जडलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, याला अगदी लहान मुलं सुद्धा अपवाद नाहीयेत. बऱ्याचदा आपण बिझी असतो किंवा काही कामात असताना मूल ऐकत नाही म्हणून त्याच्या हातात मोबाईल देतो त्याच आवडीचं एखाद कार्टून लावून देतो आणि तो कार्टून पाहत बसतो आणि आपण आपलं काम उरकून घेतो. पण मुलांसाठी ही सवय चांगली नाहीये हे आपण जाणतो पण काही वेळा आपण अडकून जातो काय करायचं आपल्याकडे दुसरा पर्यायच नसतो . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात अनेक प्रकारचे स्मार्टफोन (smartphone) लाँच झाले मात्र कधी लहान मुलांसाठी खास फोन आहे असं तुम्ही ऐकलंत का? नसेल ऐकलं तर आता ही बातमी वाचा,कारण बाजारात खास लहान मुलांसाठी स्मार्ट फोन (smart phone for kids) आलाय.लहान मुलांच्या सुरक्षेचा विचार करता एक नवीन आधुनिक स्मार्ट फोन आता तुम्ही वापरू शकणार आहात ' हा फोन खूप खास आहे.


भारतात जेवढेही स्मार्टफोन्स आहेत ते सगळे हाय टेक्निक (high technic smart phones for kids ) आहेत युजर्सना हवे असलेले सगळे फीचर्स त्यात आहेत .हे फोन वापरताना युजर्सना खूप छान वाटत असेल मात्र एक समस्या नक्की येते ती म्हणजे अडल्ट हा फोन हाताळू शकतात पण घरी असणाऱ्या लहान मुलांचं काय ? (Affordable safety Phone For Kids in market know the features in marathi )


अशात लहान मुलांचा विचार करून हा फोन डिजाईन केला गेलाय हा फोन वापरणं इतकं सोपं आहे कि अगदी तीन ते पाच वर्ष वयाची लहानमुले देखील हा फोन अगदी सहजरित्या वापरू शकतात आणि गरज पडल्यास किंवा काही अडचण आली तर आपल्या पालकांना लगेच काॅल करू शकतात


चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा स्मार्ट फोन जो खास बनवला गेलाय लहान मुलांसाठी. 


आपण ज्या फोनविषयी बोलतोय तो फोने अमॅझॉनवर उपलब्ध आहे  या फोनचं नाव आहे  Easyfone Star इझीफोन किड्स. हा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर फोन्सपैकी खूप वेगळा आहे बऱ्याच पालकांना कदाचित या फोन विषयी माहित नसावं पण हा फोन आता बाजारात आला आहे. हा फोन आकाराने लहान आहे वजनाने सुद्धा हलका आहे कोणतही लहान मूलं हा फोन सहजपणे हाताळू शकतो 


काय आहेत FEATURES 


लहान मुलांसाठी उपयुक्त अशी सगळी फीचर्स या फोनमध्ये देण्यात आली आहेत रिस्ट्रिक्टेड आउटगोइंग, रिस्ट्रिक्टेड इनकमिंग, एस ओ एस, बटन डिस्क्रीट लिस्टिंग, केयर टच कंफिगर्ड ओनली, सेफ चार्जिंग, टैंपर प्रूफ और जीपीएस ट्रॅकिंग या सगळ्या फीचर्सचा समावेश आहे. काही समस्या असेल किंवा तुमचं मूल प्रॉब्लेम मध्ये असेल तर नंबर डायल करण्याऐवजी सरळ तुमच्या फोटोवर क्लिक करून तुम्हाला कॉल करू शकतो स्क्रीनवर तुमचा फोटो नंबरसहित सेव्ह करू शकता ही सुविधा आहे 
लहान मूळ अगदी सहज हा फोन समझू शकतात आणि वापरू शकतात,


काय आहे किंमत 


हा फोन अमेझॉन वर उपलब्ध आहे आणि याची किंमत फक्त 3499 रुपये इतकी ठेवण्यात आलेय त्यामुळे हा फोन तुम्ही मुलांना सेफ्टीसाठी नक्की घेऊन देऊ शकता