नवी दिल्ली : फक्त 1500 रुपयात स्मार्टफोनची घोषणा करणाऱ्या रिलायंस जिओने सगळ्याच मोबाईल फोन कंपन्यांची झोप उडवली आहे. जिओच्या हँडसेटनंतर भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी आयडियाने देखील स्वस्त मोबाईल हँडसेट आणण्याची तयारी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आइडिया सेल्यूलरने मोबाईल उत्पादनासोबत स्वस्‍त फोन बनवण्याच्या दिशेने चर्चा सुरु केल्या आहेत. कंपनी मोबाईल निर्माता कंपनींसोबत काम करत आहे. लवकरच फोन बाबत आयडिया कंपनीकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.


आइडियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, मोबाईल हँडसेटची किंमत कमीत कमी करण्यासाठी काम सुरु आहे. या फोनची किंमत २५०० रुपये असण्याची शक्यता आहे. 


आइडिया जिओकडून फोनवर कोणतीच सबसिडी नसणार आहे. मुकेश अंबानींच्या रिलायंस जिओने टेलीकॉम सेक्टरमध्ये धमाका करत १५०० रुपयात जिओफोन लॉन्च केला होता.


जियोफोनची किंमत 0 रुपये आहे. फोन फ्रीमध्ये दिला जाणार आहे. यासाठी लोकांना सुरुवातील १५०० रुपये मोजावे लागणार आहे. ज्यावर फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. ३ वर्षानंतर फोन परत केल्यास १५०० रुपये परत मिळणार आहेत.