ट्विटरवर (Twitter) अनेक विषयांवरील ट्रेण्ड सुरु असतात. पण आज ट्विटरवर  ट्विटरवरचीच चर्चा आहे. ट्विटरने युजर्ससाठी खास गिफ्ट आणलं आहे. ट्विटर अखेर ते फीचर घेऊन येत आहे ज्याची लोक अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. लवकरच ट्विटर आपल्या यूजर्सना एक खास भेट देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरने गुरुवारी जाहीर केले की ते ट्विटरवर बहुप्रतिक्षित एडिट (Edit) ऑप्शन आणत आहे. तुमच्या ट्विटमध्ये बदल करण्यालाठी आता एडिटचे बटण असणार आहे. येत्या आठवड्यात ट्विटर ब्लू युजर्ससाठी (Twitter Blue) हे फिचर सुरु करणार आहे असे कंपनीने म्हटलं आहे.


हे फिचर युजर्सना ट्विट पोस्ट केल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत ट्विट एडिट करण्यास परवानगी देईल. एडिट केलेल्या ट्विटवर ते त्यासंदर्भात एक मेसेज त्या ट्विटसोबत दिसणार आहे. विशेष म्हणजे युजर्सला एडिटेड ट्विटसोबत मूळ ट्विटही पाहता येणार आहे.



आत्तापर्यंत, एकदा ट्विट केलेली पोस्ट एडिट केली जाऊ शकत नव्हते. बदल केलेला आहे हे सांगण्यासाठी युजर्सला ते रिट्विट करावे लागत होते. 


ट्विटरच्या म्हणण्यानुसार, एडिट बटणाची सध्या चाचणी केली जात आहे आणि येत्या काही आठवड्यांत ते ट्विटर ब्लू युजर्ससाठी आणले जाईल. कंपनीचे म्हणणे आहे की इतर ठिकाणी सुरु करण्यापूर्वी या फिचरची एकाच देशात चाचणी केली जाईल. Twitter Blue ही कंपनीची प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवा आहे जी युजर्संना इतर युजर्सपूर्वी नवीन आणि विशेष फिचर देणार आहे.


एडिट बटण युजर्सना ट्विट पोस्ट झाल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत ट्वीट एडिट करण्यास परवानगी देईल.  ट्विटमध्ये ट्विट एडिट केले गेले आहे हे सूचित करण्यासाठी लेबल, टाइमस्टॅम्प आणि चिन्हे असतील. ट्विटर युजर्स ट्विटवर क्लिक करू शकतील आणि मूळ पोस्टमध्ये केलेले सर्व बदल पाहू शकतील.