मुंबई : व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर सगळीकडे गोंधळ निर्माण झाला होता. याला २४ तासही उलटले नसताना आता मेसंजर डाऊन झाल्याची बातमी आली आहे. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि काही देशांमध्ये सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान मेसेंजर सर्व्हिस बंद राहिली असल्याचे म्हटले जात आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन तासाच्या वेळात अनेक फेसबुक अकाऊंट युजर्स एकमेकांना मेसेज पाठवू शकत नव्हते.



एवढच नव्हे तर काहींना हिस्टरी तसेच जुने पाठविलेले मेसेजही दिसत नव्हते.



 भारताव्यतिरिक्त ब्रिटन, अमेरिकासह जगभरातील अनेक देशांमध्ये व्हाट्सअॅप बंद होण्याच्या बातम्या आल्या. काही वेळाने ही सर्व्हिस सर्वसामान्य झाली. पण सर्व्हिस बंद असताना ट्विटरवर हा टॉपिक ट्रेंडिंगवर राहिला. व्हॉट्सअॅप युजर्सनी  #Whatsappdown हा हॅशटॅग वापरून आपल्या तक्रारी सांगितल्या.